Maharashtra Lok Sabha election : महाराष्ट्रात महायुतीच्या जागा घटणार? मोदींनी दिले उत्तर
Mahayuti Lok Sabha election Maharashtra : महायुतीच्या जागा महाराष्ट्रात कमी होतील, असे विरोधकांकडून सांगितले जात आहे. त्याला पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पंतप्रधान मोदी यांची मुलाखत
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या जागांबद्दल अंदाज
महायुतीच्या यशाबद्दल मोदींचे विधान
PM Modi Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील वातावरण लोकसभा निवडणुकीमुळे घुसळून निघालं असून, महाराष्ट्रात महायुतीच्या जागा घटणार, तर आम्ही जास्त जागा जिंकू, असा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या या दाव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. (The opposition is claiming that BJP's seats are going to decrease in Maharashtra. It has been answered by Prime Minister Shinde)
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सकाळ'ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित होत असलेल्या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी यांनी भूमिका मांडली आहे.
'महाराष्ट्रातील तुमच्या जागा यंदा कमी होती, असा अनेक विरोधकांचा दावा आहे. तुम्हाला काय वाटते?', असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला.
हे वाचलं का?
Maharashtra Lok Sabha : मोदींनी काय दिले उत्तर?
पंतप्रधान मोदी या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, "विरोधकांनी त्यांना स्वतःला किती जागा मिळतील, याची चिंता करावी. सुमारे दशकभराच्या अकार्यक्षमतेबरोबरच आता, मतदारांशी संपर्क तुटल्याचाही धोका त्यांच्यासमोर आहे."
"ते विरोधक म्हणूनही अपयशी ठरले आहेत. त्यांचे स्वरुप आता कोणताही रचनात्मक कार्यक्रम नसलेल्या शहरी नक्षलवाद्यांच्या टोळ्यासारखे झाले आहे. त्यामुले जर काही घटणार असेल, तरी विरोधकांची विश्वासार्हता घटणार आहे", असे मोदी यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
विरोधकांच्या चिंतेला आधार नाही -नरेंद्र मोदी
याच प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी पुढे म्हटले आहे की, "आमच्या जागांच्या, विशेषतः महाराष्ट्रातील जागांच्या संख्येबाबत त्यांना वाटणाऱ्या चिंतेला कोणताही आधार नाही. २०१४ आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकींमधील आणि इतर विधानसभा निवडणुकींमधील आमच्या विजयांमुळे हे स्पष्टच झाले आहे."
ADVERTISEMENT
"जनतेने आमच्यावरील विश्वास कायम ठेवल्याने प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या यशाची कमान उंचच गेली आहे. जनतेचे पाठवळ असल्याने केंद्रातही आमचे सरकार कायम आहे. भविष्यातील निवडणुकांमध्येही हेच चित्र कायम राहील आणि महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा अधिकाधिक संख्येने 'एनडीए'च्या उमेदवारांना निवडून देतील, असा मला पूर्ण विश्वास आहे", असे उत्तर मोदींनी दिले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT