कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं, 129 दिवसानंतर रूग्णांमध्ये वाढ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

देशात 129 दिवसानंतर कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. तब्बल कोरोनाच्या 1000 केसेस समोर आल्या आहेत. अशी माहिती केंद्रीय स्वास्थ मंत्रालयाने रविवारी दिली आहे.

हे वाचलं का?

देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 5,915 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 71 नवीन केसेस समोर आल्या आहेत. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

कोरोनामुळे रूग्णाच्या मृत्यू झाल्याच्या घटना राजस्थान, महाराष्ट्र आणि केरळमधून समोर आल्या आहेत.

ADVERTISEMENT

कोरोनाचे देशभरात आतापर्यंत 4.46 करोड रूग्ण आढळले आहेत. यामध्ये 0.01 ट्क्के रूग्ण सक्रिय आहेत. तर रिकव्हरी रेट 98.8 टक्के आहे.

कोरोनामुक्त रूग्णांची संख्या 4,41,58,703 आहे. तर देशात मृत्यूदर 1.19 टक्के आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. यामागे कोरोना 19XBB वेरियंटचा सब वेरियंट XBB 1.16 असू शकतो असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

भारतात आतापर्यंत कोरोना XBB 1.16 वेरीयंटची संख्या अधिक आढळली आहे.

भारतात 48, सिंगापूर 14, अमेरीकेत 15 कोरोना XBB 1.16 वेरीयंटचे रूग्ण आढळले आहेत.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT