लॉजमध्ये जोडप्याचे नग्नावस्थेत सापडले मृतदेह; पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर चिंता व्यक्त असतानाच आता पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवडमधील दिघी परिसरात एका लॉजमध्ये प्रेमी युगुलांचे नग्नावस्थेत मृतदेह आढळून आले आहेत. दिघी परिसरातील अथर्व लॉजमध्ये ही घटना घडली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ADVERTISEMENT

लॉजमध्ये दोन मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतांच्या कपड्यांची झडती घेतली असता त्यांच्या कपड्यातून महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहे. मृतकांची नावं, पत्ता व वय पूर्णपणे कागदपत्रांवर नोंद करण्यात आलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले.

लॉजमध्ये काय घडलं?

हे वाचलं का?

या घटनेबाबत पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी सांगितलं की, ‘प्रकाश ठोसर असे (28 वर्ष) मृत तरुणाचं नाव आहे. तर अश्विनी चव्हाण असं त्याच्या (35 वर्ष) प्रेयसीचं नाव आहे. प्रकाश व आश्विनी हे दोघेही बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास अथर्व लॉजमध्ये सोबतच आले होते.’

‘त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी या लोकांशी अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळू शकले नाही. त्यानंतर दुसऱ्या चावीने दरवाजा उघडून कर्मचाऱ्यांनी आत पाहिले असता प्रकाश याचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत लॉजमधील पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत होता, तर त्याची मैत्रीण ही देखील अशाच अवस्थेत बेडवर आढळून आली. हे दिसल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली’, अशी माहिती इप्पर यांनी दिली.

ADVERTISEMENT

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी या दोन्ही जोडप्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. मृतक प्रकाशने काही वादविवाद झाल्याने आपल्या प्रेयसीची हत्या केली व नंतर स्वतःही आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT