महाराष्ट्रात CoWin App वर लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी 1 लाखांहून जास्त Duplicate Sign Up

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

CoWin App वर कोरोना प्रतिबंधक लसींचा दुसरा डोस घेण्यासाठी जी नोंदणी करण्यात येते आहे त्यात 1 लाखांहून अधिक डुप्लिकेट साईन अप करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वेगवेगळ्या फोन क्रमांकावरून या नोंदण्या करण्यात आल्या आहेत हे समोर आलं आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने असं सांगितलं आहे की महाराष्ट्रात कमीत कमी असे एक लाख लाभार्थी आहेत (खासकरून फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचारी) ज्यांनी दोन डोस घेतले आहेत. मात्र तरीही त्यांचा दुसरा डोस बाकी असल्याचं दाखवलं जातं आहे. इतर राज्यांमध्ये ही संख्या किती आहे ते सांगणं कठीण आहे असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

लसीचा पहिला डोस चुकला तरी काळजी करु नका, Cowin वर अशी करा पुन्हा नोंदणी

CoWin या लसीकरणासाठीच्या अॅपवर जेव्हा वेगवेगळ्या क्रमांकावरून दुसऱ्या डोससाठी नंबर लावण्यास सुरूवात झाली त्यामुळे ही समस्या निर्माण झालेली असू शकते. आम्हाला मिळालेल्या फोन क्रमांकावर आम्ही जेव्हा फोन केले तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला. एका अधिकाऱ्याने असं सांगितलं आहे की आपला नंबर समजा एका नंबरवरून लागला नाही तर त्याच व्यक्तीने दुसऱ्या डोससाठी नंबर लावण्यास दुसऱ्या फोनवरून प्रयत्न केला असेल किंवा तिसऱ्या फोनवरून प्रयत्न केला असेल. एवढंच नाही तर इमेल आयडीही वेगवेगळे वापरले असतील तर असा प्रकार घडू शकतो. सध्या तरी बनावट नोंदण्या असलेल्यांची संख्या 1 ते सव्वा लाखांच्या घरात आहे. आम्ही आता या नोंदण्या हटवण्याचं काम करतो आहोत असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

CoWin वर आता नव्या Security Feature चा समावेश

मुंबई तकने याबाबत राज्याचे लसीकरण अधिकारी N D पाटील यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले की ‘असा प्रकार घडल्याची माहिती आमच्याकडे आहे. हे नेमकं कसं काय घडलं त्याची आम्ही कसून चौकशी करत आहोत. तसंच यापुढे हे असे प्रकार घडणार नाहीत यासाठीही आम्ही प्रयत्न करतो आहोत. किती लोकांनी दुसऱ्या-तिसऱ्या नंबरचा आधार घेऊन CoWin अॅपवर लसीचा दुसरा डोस मिळावा म्हणून नोंदणी केली आहे ते निश्चितपणे सांगता येणार नाही मात्र ही संख्या 1 लाखांच्या वर आहे’

ADVERTISEMENT

ज्यांनी या नोंदण्या केल्या आहेत त्यांनी 45 वर्षे वयोगटाच्या वरील लोकांच्या नंबरवरूनही या नोंदण्या केल्या असू शकतात. सध्या मोठ्या प्रमाणावर CoWin App वरचं स्क्रबिंग हटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डुप्लिकेट साईन अपचा हा प्रकार रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

पुणे ग्रामीण भागात 2 हजार 172 प्रकरणं डुप्लिकेट साईन-अपची असल्याचं समोर आलं आहे. अशा लाभार्थ्यांना दोन्ही डोस पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र मिळणार नाही. ज्यांनी डुप्लिकेट साईन अप केलं आहे त्यांच्या दोन्ही लसी पहिला डोस म्हणूनच धरल्या जाणार असल्याने हा घोळ निर्माण झाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT