Crime : प्रेमाचा भयानक अंत; एकाच झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडलं जोडपं
Solapur Crime news : सोलापूर : शहरानजीक कवठे गावच्या शिवारात प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरज कुंडलीक चव्हाण (वय २५) असं यातील युवकाचं नाव असून युवती अल्पवयीन आहे. दोघांच्या लग्नास घरच्यांचा असलेला विरोध हे आत्महत्येचं प्रमुख कारण असल्याचं प्राथमिकदृष्ट्या सांगितलं जातं आहे. मात्र याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. (The shocking […]
ADVERTISEMENT

Solapur Crime news :
सोलापूर : शहरानजीक कवठे गावच्या शिवारात प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरज कुंडलीक चव्हाण (वय २५) असं यातील युवकाचं नाव असून युवती अल्पवयीन आहे. दोघांच्या लग्नास घरच्यांचा असलेला विरोध हे आत्महत्येचं प्रमुख कारण असल्याचं प्राथमिकदृष्ट्या सांगितलं जातं आहे. मात्र याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. (The shocking incident of a couple committed suicide in Kavatha village near Solapur city.
याबाबत नातेवाईंकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी सोलापूर शहरानजीकच्या गावातील महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत होती. तर मुलगा सुरज चव्हाण हा मोहोळ तालुक्यातील खुणेश्वर या गावातील रहिवासी असून तो चिंचोळी एमआयडीसीमधील एका कंपनीत नोकरी करत होता. वर्षभरापूर्वी अल्पवयीन तरूणी मामाच्या गावात सुट्टीसाठी आली होती. त्यावेळी खुणेश्वर गावातील सूरज चव्हाणसोबत तिचे प्रेमसंंबंध जुळले. मात्र संबंधांची चाहूल लागताच मुलीला परत आई-वडिलांकडे पाठवण्यात आले होते.
MIM चे खासदार म्हणतात, ‘शिवसेनेचे चार तुकडे झाले तर आमच्यासाठी चांगलंच’










