अमरावतीनंतर अकोल्यातही दोन दिवसांची संचारबंदी लागू, पोलिसांचा कडेकोट बंंदोबस्त
अमरावती दंगलीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात तणावपूर्ण शांतात आहे. परंतू कोणताही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी अकोट आणि अकोला या दोन्ही शहरांमध्ये दोन दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने तसे आदेश जारी केले आहेत. आज सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला असून रात्री ७ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंच संचारबंदीचा […]
ADVERTISEMENT

अमरावती दंगलीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात तणावपूर्ण शांतात आहे. परंतू कोणताही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी अकोट आणि अकोला या दोन्ही शहरांमध्ये दोन दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने तसे आदेश जारी केले आहेत.
आज सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला असून रात्री ७ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंच संचारबंदीचा आदेश देण्यात आला आहे. अमरावती दंगलीच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातही वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वी अकोला शहरात भंगाराच्या दुकानाला आग लावल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
अमरावती हिंसाचार : चिथावणी देणाऱ्या 36 पोस्ट सायबर पोलिसांच्या हाती; वाचा काय आहे पोस्टमध्ये?
शहरांत अफवांचा बाजार पेटलेला असताना कोणताही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी प्रशासनाने संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. अकोला शहराच्या प्रमुख रस्त्यांवर आणि अतिसंवेदनशील भागांत पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. अमरावती आणि अकोल्याचे पोलीस अधिक्षक स्वतः रस्त्यावर उतरुन सर्व बंदोबस्त चोख आहे याची काळजी घेत आहेत.