Devendra fadnavis : ‘राहुलजी, काल तुम्ही सांगितलं होतं, आज मी तुम्हाला काही कागदपत्रं वाचायला देतो’
वीर सावरकरांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली. त्यांनी अंदमानच्या तुरूंगात असताना माफीनामा लिहिला असं म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी टीका केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण तापलंय. भाजप-मनसे आक्रमक झालीये. तर शिवसेनेनं काहीसं अंतर राखत या विधानाशी सहमत नसल्याचं म्हटलंय. राहुल गांधींनी सावरकरांची पिटिशन दाखवली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना कागदपत्रे पोस्ट करत वाचण्याचा सल्ला दिलाय. वीर सावरकर वाद […]
ADVERTISEMENT

वीर सावरकरांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली. त्यांनी अंदमानच्या तुरूंगात असताना माफीनामा लिहिला असं म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी टीका केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण तापलंय. भाजप-मनसे आक्रमक झालीये. तर शिवसेनेनं काहीसं अंतर राखत या विधानाशी सहमत नसल्याचं म्हटलंय. राहुल गांधींनी सावरकरांची पिटिशन दाखवली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना कागदपत्रे पोस्ट करत वाचण्याचा सल्ला दिलाय.
वीर सावरकर वाद : देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींना उत्तर
देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरवर काही कागदपत्रं शेअर केलीत. देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राहुलजी, काल तुम्ही मला एका पत्रातील अखरेच्या ओळी वाचायला सांगितल्या होत्या. ठिके, आता मी काही दस्ताऐवज तुम्हाला वाचायला देतो. आपल्या सगळ्यांसाठी आदरणीय असलेल्या महात्मा गांधींचं हे पत्र तुम्ही वाचलं का? तशाच अखेरच्या ओळी यात आहेत का? ज्या तुम्ही मला वाचायला सांगत होतात.”
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणतात, “आता भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (तुमची आजी) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काय म्हटलं होतं, तेही जरा वाचा… यात त्यांनी म्हटलं होतं की, सावरकर स्वातंत्र्य आंदोलनाचे आधारस्तंभ आणि भारताला सदैव आठवत राहतील असे सुपूत्र आहे, असं त्या म्हणतात”, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.
देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींना दाखवला शरद पवारांचा व्हिडीओ…
या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचा एक व्हिडीओही पोस्ट केलाय. “महाराष्ट्राच्या राजकारणात ज्याचं स्वतःचं एक खास स्थान आहे, ते शरद पवार वीर सावरकर यांच्याबद्दल काय म्हणत आहेत? जरा तेही वाचा, ऐका. याच पत्रात ते दोन आजन्म कारावासांचा उल्लेख करतात”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर पलटवार केलाय.