Dhananjay Munde : "देवेनभाऊ आणि अजितदादांनीच उत्तर द्यावं...", दमानियांच्या आरोपानंतर काय म्हणाले मुंडे?

मुंबई तक

धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि त्यांच्या पत्नीचे आर्थिक व्यवहार असल्याचे पुरावे मी दाखवले असं म्हणत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर आज धनंजय मुंडेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईत

point

अंजली दमानिया यांच्या आरोपांवर काय म्हणाले?

अंजली दमानिया या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटल्या. यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले,  "ज्या कागदपत्रांसह त्या भेटल्या, त्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच स्पष्टीकरण द्यावं अशी माझीही इच्छा आहे. तसंच  थर्मल पॉवर स्टेशनची राख म्हणजे कचरा, तो त्यांनीच खर्च करुन उचलला पाहिजे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. अशा निर्णयाच्या बाबतीत सरकारशी संलग्नित नसलेल्या या गोष्टीमध्ये प्रॉफीट ऑफ बेनिफीटचा विषय येत नाही असं धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे हे आज मंत्रालयाच्या बैठकीसाठी उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

हे ही वाचा >> Infosys चे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन यांच्यावर SC/ST कायद्यांतर्गत गुन्हा; कुणी केले आरोप?

फरार कृष्णा आंधळेबद्दल संदीप क्षीरसागर यांनी जी शंका व्यक्त केली. त्याबद्दल बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, संदीप क्षीरसागर यांना कृष्णा आंधळेंबद्दल माहिती असेल, तर त्यांचा काहीतरी त्यांच्याशी संबंध आहे असं वाटतंय असं धनंजय मुंडे म्हणाले. माध्यमांबद्दलचा आदर बीडमध्ये कमी होतोय. काय खरं काय खोटं याची तपासणी केल्यावर एखाद्या जिल्ह्यावर, नेत्यावर, मतदारसंघावर मिडिया ट्रायल चाललं पाहिजे. पण संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या त्या गुन्हेगारांना फास्टट्रॅकमध्ये नेऊन फासावर घातलं पाहिजे असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. 

हे ही वाचा >> Devendra Fadnavis : सैफच्या केसमध्ये पकडलेल्या आरोपीचे ठसे मॅच होईना? फडणवीसांचं उत्तर, म्हणाले...

अंजली दमानिया यांनी काल अजित पवार यांची भेट घेतली होती. अजित पवार यांच्या भेटीत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधातले सर्व पुरावे दिले असंही त्यांनी सांगितलं आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या, आमची 25 ते 30 मिनिट भेट झाली. बीडमधली घटना माणुसकीला धरून नाही, हे त्यांनी मान्य केलं. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि त्यांच्या पत्नीचे आर्थिक व्यवहार असल्याचे पुरावे मी दाखवले. ते 'ऑफिस ऑफ प्रॉफिट' कसे आहेत, हे गृह मंत्रालयाच्या 102 (a) आणि 129 या कलमानुसार हे दाखवून दिले. असं दमानिया म्हणाल्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp