डोंबिवलीत दुकानात घुसून मारहाण; दुकान मालकासह पत्नी, मेहुणी जखमी
डोंबिवली पूर्वेमधील रामनगर हद्दीमध्ये दुकानदारासह त्याच्या दोन मुलांनी शेजारच्या दुकानदारासह दोन महिला नातेवाईकांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून, रामनगर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या मारहाण करणाऱ्या दुकानदारासह त्याच्या दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिघांना अद्याप अटक केलेली नाही. मंगळवारी (२ ऑगस्ट) डोंबिवलीत शिवसैनिक आणि शिंदे समर्थकांमध्ये जोरदार […]
ADVERTISEMENT
डोंबिवली पूर्वेमधील रामनगर हद्दीमध्ये दुकानदारासह त्याच्या दोन मुलांनी शेजारच्या दुकानदारासह दोन महिला नातेवाईकांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून, रामनगर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या मारहाण करणाऱ्या दुकानदारासह त्याच्या दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिघांना अद्याप अटक केलेली नाही.
ADVERTISEMENT
मंगळवारी (२ ऑगस्ट) डोंबिवलीत शिवसैनिक आणि शिंदे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. या घटनेची चर्चा असतानाच डोंबिवली स्टेशन रोडवरील एका दुकानदार आणि त्याच्या दोन महिला नातेवाईकांना बाजूच्या दुकानदाराने आणि त्याच्या दोन मुलांनी बेदम मारहाण केली. पावणे दोनच्या सुमारास हा प्रकार घडला.
डोंबिवली : नेमका कशामुळे झाला वाद?
डोंबिवली पूर्वेमध्ये स्टेशन बाहेरील रोडवर राजेंद्र शेलार यांचं कपड्याचं आणि इतर साहित्याचं दुकान आहे. याचं दुकानाच्या बाजूला देवराज पटेल दुबरिया यांचं देखील दुकान आहे. देवराज पटेल दुबरिया हे आपल्या दुकानातील कपड्याचा पुतळा शेलार यांच्या दुकानाला खेटून वारंवार ठेवत होते. अनेक वेळेला विनंती करून सुद्धा देवराज यांनी ते ऐकलं नाही.
हे वाचलं का?
मंगळवारी (२ ऑगस्ट) परत देवराज यांनी दुकानाला खेटून कपड्याचा पुतळा ठेवला. दुकानदार राजेंद्र शेलार यांनी पुतळा बाजूला हटवा, असं सांगितलं याचं कारणावरून देवराज दुबरिया, त्यांचे दोन मुले मयूर आणि प्रितेश यांनी शेलार, त्यांच्या पत्नी सुवर्णा आणि मेव्हणी अंजना यांना बेदम मारहाण केली आहे. शेलार यांच्या दुकानातील छत्री व इतर समान घेऊन मारहाण केली.
मारहाणीत स्वतः राजेंद्र शेलार यांच्यासह त्यांच्या पत्नी पत्नी सुवर्णा आणि मेव्हणी अंजना जखमी झाल्या. तर शेलार यांच्या दुकानातील सामानाचंही नुकसान झालं आहे. सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, आरोपी देवराज दुबरिया, मयूर दुबरिया आणि प्रितेश दुबरिया यांच्या विरोधात (कलम ४५२,३२४,३२३,४२७,आणि ३४ प्रमाणे) रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घडलेल्या घटनेबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांना म्हणाले, ‘गुन्हा दाखल केला आहे, मात्र आरोपींना अटक केलेली नाहीये.’ याप्रकरणात सांडभोर यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. दरम्यान, आरोपींना अटक का केली जात नाही? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. दुसरीकडे जखमी झालेले दुकानदार राजेंद्र शेलार यांनी ‘आम्हला न्याय दयावा’, अशी मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT