उस्मानाबाद : सव्वा कोटीचा गांजा जप्त, चौघे तस्कर फरार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत मस्सा (खांडेश्वरी) शिवारात कडब्याच्या गंजीत दडवून ठेवलेला ४७ पोती गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ३१ मे रोजी संध्याकाळी ४ वाजता ही कारवाई केली. पोलिसांनी या कारवाईत १ हजार १३२ किलो गाजां जप्त केला असून बाजारात याची किंमत सव्वा कोटीच्या घरात आहे.

ADVERTISEMENT

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मस्सा शिवाराज गांजाची पोती लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलीस पथकाने मस्सा शिवारातील बालाजी काळे यांच्या शेतात लपवून ठेवण्यात आलेला गांजा जप्त केला. दरम्यान पोलीस कारवाईचा सुगावा लागताच बालाजी काळे व त्याचे तीन साथीदार फरार झाले आहेत. रात्री उशीरा या प्रकरणात गुन्ह्याची नोंद झाली असून या रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास घेतला जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT