या कारणामुळे अभिनेता श्रेयस तळपदेवर होतोय चोरीचा आरोप
अद्वैत थिएटर या नाट्यनिर्मिती संस्थेचे निर्माते राहुल भंडारे यांनी त्यांच्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचा सेट चोरीला गेला असल्याची तक्रार शिवडी पोलिस ठाण्यात दिली आहे. ‘करोनामुळे सध्याच्या लॉकडाउनच्या काळात नाट्यसृष्टी बंद आहे. त्यामुळे माझ्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचा सेट प्रवीण भोसले यांच्या काळाचौकी येथील गोदामात ठेवण्यात आला होता. मात्र, तो सेट कोणतीही पूर्वकल्पना न देता श्रेयस […]
ADVERTISEMENT

अद्वैत थिएटर या नाट्यनिर्मिती संस्थेचे निर्माते राहुल भंडारे यांनी त्यांच्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचा सेट चोरीला गेला असल्याची तक्रार शिवडी पोलिस ठाण्यात दिली आहे. ‘करोनामुळे सध्याच्या लॉकडाउनच्या काळात नाट्यसृष्टी बंद आहे. त्यामुळे माझ्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचा सेट प्रवीण भोसले यांच्या काळाचौकी येथील गोदामात ठेवण्यात आला होता. मात्र, तो सेट कोणतीही पूर्वकल्पना न देता श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांनी गोदाम मालकास खोटे सांगून गोदामातून चोरून ‘भक्षक’ या एकांकिकेच्या चित्रीकरणासाठी वापरला आहे,’ असे भंडारे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे
श्रेयस तळपदेच्या ‘नाइन रसा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी काही दिवसांपूर्वी ‘भक्षक’ या एकांकिकेचे चित्रीकरण दादर येथील स्वातंत्रवीर सावरकर नाट्यगृहात झाले. या चित्रीकरणावेळी ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचा सेट वापरण्यात आल्याचे नाटकाचे निर्माते राहुल भंडारे यांनी सांगिलते. ते पुढे म्हणतात, ‘अलबत्या गलबत्या या नाटकाशी निगडीत सर्व सेट हा अद्वैत थिएटर संस्थेची ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी’ असून, आमच्या परवानगीशिवाय वापरली असल्यामुळे हे चित्रीकरण कुठेही प्रदर्शित करू नये; अन्यथा ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स’ अंतर्गत श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’