एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे लवकरच एकत्र येणार?; शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

‘येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून चर्चा करायला एकत्र येणार, हे समजल्यावर खूप बरं वाटलं,’ असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी ठाकरे-शिंदे मनोमिलनाच्या शक्यतेबद्दल मोठं विधान केलं. या विधानावरुन राज्यात चर्चा सुरू झाली आणि दिल्लीत खासदार संजय राऊतांनी वेगळी भूमिका मांडली, त्यामुळे शिंदे-ठाकरे यांच्या भेटीवरून संभ्रम निर्माण झालाय.

ADVERTISEMENT

दिपाली सय्यद काय म्हणाल्या आहेत?

‘येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. एकनाथ शिंदे यांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव ठाकरे यांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली, हे स्पष्ट झालं आहे. या मध्यस्थी करीता भाजप नेत्यांनी मदत केली, याबाबत धन्यवाद. चर्चेच्या ठिकाणाची प्रतिक्षा असेल,’ असं दिपाली सय्यद यांनी ट्विट करून सांगितलं.

‘…याच भयातून शिवसेना फोडली अन् उद्धव ठाकरेंचे पाय खेचले’; संजय राऊतांचा गंभीर आरोप

हे वाचलं का?

पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांचे आभार?

दिपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये भाजप नेत्यांचे आभार मानले आहेत. ट्विटमध्ये भाजपच्या नेत्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आलेला नसला, तरी त्यांनी हे ट्विट भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत असलेल्या पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना टॅग केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं मनोमिलन घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य भेटीबद्दल संजय राऊत काय म्हणालेत?

दिपाली सय्यद यांच्या ट्विटबद्दल संजय राऊत यांनी भूमिका मांडली. “याविषयी माझ्याकडे माहिती नाही. मी पक्षातील खूप लहान कार्यकर्ता आहे. अत्यंत लहान कार्यकर्ता आहे. शिवसेनेचा तळागाळातील कार्यकर्ता आहे,” असं सांगत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य भेटीच्या चर्चेवर उत्तर दिलं.

ADVERTISEMENT

‘एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र यायचं असेल, तर…’; उदय सामंत यांचं पुण्यात विधान

ADVERTISEMENT

संजय राऊतांची भगतसिंह कोश्यारींवर टीका

“राज्यपाल याकडे दुर्लक्ष नाही, तर ते दरवाजे, खिडक्या बंद करून बसले आहेत. त्यांना आता काहीच दिसत नाहीये. कायद्याची पायमल्ली दिसत नाही. बेकायदेशीरपणे घेतले जाणारे निर्णय दिसत नाही. राज्यात निर्माण झालेला रोष दिसत नाही. त्यांनी दरवाजे-खिडक्या अशा पद्धतीने बंद केलेत की बाहेरचा आक्रोश आत येणार नाही,” अशी टीका राऊतांनी केली आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी

संजय राऊत यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलीये. “राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दोघांचंच मंत्रिमंडळ आहे. कायदेशीर आहे की नाही, गोष्टी नाहीत. पण नैतिकता काय? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ती सुनावणी होईपर्यंत इथं राज्य नसावं असं मी म्हणतोय,’ असं संजय राऊत म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT