NCP: राष्ट्रीय दर्जा जाणार? शरद पवारांच्या नागालँडमधील खेळीमागे ‘हे’ होतं कारण!
NCP national party status, Election Commission of india: अलिकडेच नागालँडमध्ये विधानसभा निवडणूक झाली. निवडणुकीत राष्ट्रवादीला अनपेक्षितपणे मोठं यश मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आले. नागालँडच्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असेल, अशी स्थिती असताना शरद पवारांनी एक खेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा पाठिंबा असलेल्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. […]
ADVERTISEMENT
NCP national party status, Election Commission of india: अलिकडेच नागालँडमध्ये विधानसभा निवडणूक झाली. निवडणुकीत राष्ट्रवादीला अनपेक्षितपणे मोठं यश मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आले. नागालँडच्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असेल, अशी स्थिती असताना शरद पवारांनी एक खेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा पाठिंबा असलेल्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. आता याचं कारण समोर आलंय.
आता राष्ट्रवादी काँग्रेसनं नागालँडमध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला, याची उलट सुलट चर्चा आल्यानंतर एक गोष्ट गेल्या काही दिवसांत घडली. ती म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने आता देशातील राष्ट्रीय पक्ष दर्जा असलेल्या पक्षांचा जनाधार घटलाय की दर्जा कायम ठेवण्याइतपत आहे, याचा आढावा सुरू केलाय. त्यातच राष्ट्रवादीच्या निर्णयाची मूळ आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यासह देशभरात मोहर उमटवली आहे. मात्र, आता निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय दर्जाबाबत फेरविचार सुरु आहे. त्यामुळे, शरद पवारांच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा जाणार की राहणार अशी चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रीय पक्ष हा दर्जा मिळवण्यासाठी काय निकष आहेत, राष्ट्रवादीची देशभरातील स्थिती कशी आहे?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
Nagaland मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने चमत्कार कसा केला? वाचा Inside Story
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विशिष्ट कालावधीनंतर देशातल्या राष्ट्रीय पक्षांच्या दर्जाबद्दलचा (म्हणजे राष्ट्रीय पक्ष) आढावा घेतला जातो. पक्षाला राष्ट्रीय दर्जा असण्या इतका जनाधार आहे का? याचा आयोगाकडून आढावा घेतला घेतला जातो. त्याप्रमाणे आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्षाला नोटीस पाठवली होती. या पक्षांना मंगळवारी त्यांची बाजू मांडण्याची सूचना करण्यात आली होती. त्याप्रमाणे राष्ट्रवादीकडूनही निवडणूक आयोगासमोर त्यांची बाजू मांडण्यात आली.
ADVERTISEMENT
पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळण्याचे निकष-
खालीलपैकी कोणतीही एक अट पूर्ण करणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा दिला जातो
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीत किमान ३ राज्यांमध्ये २ टक्के जागांवर विजय आवश्यक
लोकसभेत किमान चार जागा आणि किमान सहा टक्के मते मिळाली पाहिजेत.
पक्षाला ४ किंवा अधिक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळणं आवश्यक
किमान चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत सहा टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळणं गरजेचं.
Devendra Fadnavis यांनी डाव फिरवला; ‘तो’ शपथविधी शरद पवार यांच्याच संमतीने!
सध्याचे देशातील राष्ट्रीय पक्ष-
1. भारतीय जनता पक्ष (भाजप)
2. काँग्रेस
3. बहुजन समाज पक्ष (BSP)
4. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP)
5. भारतीय कम्युनिस्ट पक्ष
6. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
7. तृणमूल काँग्रेस (TMC)
8. नॅशनल पीपल्स पार्टी (NPP)
राष्ट्रवादी काँग्रेसची देशभरातील ताकद-
राष्ट्रवादीचे लोकसभेत ५ आणि राज्यसभेत ४ खासदार आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत.
नुकत्याच झालेल्या नागालँडच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ७ आमदार निवडून आलेत.
राष्ट्रवादीचे केरळ विधानसभेत २ तर गुजरात विधानसभेत १ आमदार आहे.
वेदांता ग्रुपवर माझा विश्वास नाही असं का म्हणाले शरद पवार?
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा जाणार की राहणार?
राष्ट्रवादी काँग्रेस नागालँडमध्ये भाजपसोबत गोल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. मात्र, पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवणं हे पवारांसमोरचं एक मोठं आव्हान होतं. त्यात नागालँडमध्ये निवडून आलेल्या आमदारांमुळे राष्ट्रवादीचा जनाधार वाढला. मात्र, विरोधी बाकांवर बसल्यास हे आमदार सत्ताधारी पक्षात सामील होण्याची भीतीही होती. त्याच दृष्टीनं नागालँडमधील आमदार टिकून राहावेत आणि राष्ट्रीय दर्जा कायम ठेवण्याच्या दृष्टीनं पवारांनी हे पाऊल उचललं असावं, असं आता म्हटलं जात आहे.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असला की पक्षाला सगळ्या राज्यांमध्ये एकाच चिन्हावर निवडणूक लढता येते. तसंच, राजधानी दिल्लीत पक्ष कार्यालयासाठी जागाही मिळते. त्यामुळे, प्रत्येक पक्ष हा दर्जा टिकवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार पक्षात ठेवण्यात यश मिळवलं असलं, तरी पक्षाच्या राष्ट्रीय दर्जाचं काय होणार हे मात्र निवडणूक आयोगाच्याच हातात आहे.
ADVERTISEMENT