हनीमून दिवशी पत्नीनं नवऱ्याला दूध पाजलं, नंतर केली 'ती' मागणी, नवरा खोली बाहेर पडला अन् ...

मुंबई तक

crime news : लग्नसोहळा झाल्यानंतर हनीमूनच्या दिवशीच नवऱ्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे. मेरठचा मोहसीन लग्नाच्या रात्रीच आपल्या पत्नीजवळ गेला आणि तिनं त्याच्याकडे अशी एक मागणी केली तो खोलीतून बाहेर पडला आणि पुन्हा आलाच नाही.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हनीमून दिवशी नवरा पत्नीपासून दूर गेला

point

पत्नीने लग्नाच्या पहिल्याच रात्री केली ती मागणी

Crime News : लग्नसोहळा झाल्यानंतर हनीमूनच्या दिवशीच नवऱ्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे. मेरठच्या मोहसीन लग्नाच्या रात्रीच आपल्या पत्नीजवळ गेला. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला प्यायला दूध दिले होते. नंतर तिने आपल्या खोलीतील प्रकाश अधिक आहे, एक झिरो बल्बची मागणी केली. मोहसनीन मध्य रात्रीच बल्ब आणण्यासाठी गेला असता, त्यानंतर धक्कादायक प्रसंग घडला आहे. 

हे ही वाचा : जतमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरावर आणि गाडीवर दगडफेक करत काचा फोडल्या, हल्ल्यामागे पडळकरांचे कार्यकर्ते?

हनीमून दिवशी नवरा पत्नीपासून दूर गेला

मेरठच्या सरधना पोलीस ठाणे परिसरातील रहिवासी मोहसीनने बुधवारी मुझफ्फरनगर येथे एका महिलेशी विवाह केला होता. तो लग्नानंतर आपल्या नवविवाहितेला घेऊन घरी परतला. नंतर कुटुंबाने त्यांना खोलीत पाठवले. अशातच आता मोहसीन आता बेपत्ता झालेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. कुटुंबाने बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली आहे. 

पत्नीने मोहसीनकडे झिरो बल्बची केली मागणी 

लग्नानंतर दोघेही घरात असताना त्याची पत्नीने मोहसीनला झिरो बल्ब आणण्यासाठी पाठवले. तो घरी पुन्हा घरी परतलाच नाही. सुरुवातीला त्याच्या कुटुंबाने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तो कुठेही सापडला नाही. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. मोहसीनच्या दोन्ही बहि‍णींचे दुसऱ्याच दिवशी विवाह सोहळा पार पडणार होता. परिणामी, त्यांच्या भावाशिवाय रवाना करण्यात आले. याच परिस्थितीत, कुटुंब मोहसीनचा शोध घेत होते. 

हे ही वाचा : अनगर निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना खरंच धक्का? खरं कारण हे आहे...

मोहसीनचे वडील हे कंत्राटदार असून त्यांच्या कुटुंबात नऊ मुले आहेत, ज्यामध्ये सात मुली आणि दोन मुलं आहेत. मोहसीन हा धाकटा मुलगा आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की, तो लग्नासाठी खूपच आनंदी होता. नंतर तो अचानकपणे कुठे गायब झाला आणि त्याचे अद्यापही स्पष्टीकरण समोर आले नाही. या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी आशुतोष कुमार म्हणाले, पोलीस या प्रकरणाचा अनेक बाजूने तपास करत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp