'..अमेरिकेत 'ही' फाईल उघड झाल्यास महिन्याभरात मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता', पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य
Former Chief Minister Prithviraj Chavan Statment :..तर महिन्याभरात मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'ही' फाईल उघड झाल्यास महिन्याभरात मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य
Former Chief Minister Prithviraj Chavan Statment , कराड : Epstein फाईल्स प्रकरणावरून अमेरिकेत मोठा गदारोळ निर्माण झाला असून त्याचे पडसाद भारताच्या राजकारणातही उमटू शकतात. “Epstein ही फाईल उघड झाल्यास देशाच्या राजकीय घडामोडींवर मोठा परिणाम होऊ शकतो. कदाचित महिनाभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते,” असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलंय.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “Epstein प्रकरण हे पूर्णपणे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहे. अमेरिकेतील एका उद्योगपतीने अनेक बेकायदेशीर कृत्ये करत अनेक देशांतील राजकीय व्यक्तींना त्यात गुंतवले आहे. त्या फाईलमध्ये आपल्या देशातील कोणाचे नाव आहे का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.”
हेही वाचा : मिरजेत मित्रांनीच तरुणाला ट्रॅकवर झोपवलं, रेल्वे अंगावरून गेल्याने हाता-पायांचे झाले तुकडे, तरीही जीव वाचला
सुमारे दहा हजार पानांची ही फाईल अमेरिकेच्या संसदेने ताब्यात घेतली आहे. ती फाईल सार्वजनिक करावी, यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठा दबाव वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. ही कागदपत्रे जाहीर झाली, तर अनेक गंभीर गोष्टी समोर येऊ शकतात, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.










