म्यानमारमध्ये आणीबाणीची घोषणा, आंग सान सू की अटकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारताच्या शेजारील देश असलेल्या म्यानमार देशाच्य़ा लष्कराने उठाव केला आहे. म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या असलेल्या आंग आन सू की यांना लष्कराने अटक केली असून म्यानमारमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

आंग आन सू की या म्यानमारमधला प्रमुख राजकीय पक्ष नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसीच्या नेत्या आहेत. म्यानमारच्या लष्कराने आता देशात एक वर्षासाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

म्यानमारमध्ये नोव्हेंबरमध्य़े सार्वत्रिक निवडणुक झाली होती. तेव्हा या निवडणुकीत आंग आन सू की य़ांना बहुमत मिळाले होते. लष्कराचे समर्थन असलेल्या पक्ष सॉलिडेरिटी अँड डेव्हल्पमेंट पार्टीचा या निवडणुकीत दणकून पराभव झाला होता.

हे वाचलं का?

या निवडणुकांपासूनच लष्कर आणि सरकार यांच्यात कुरबुरी सुरु होत्या. या निव़डणुकीत गैरप्रकार झाले असा लष्कराचा आरोप होता. या निवडणुकांचा पुन्हा पडताळणी करावी अशी लष्कराची मागणी होती. लष्कराने म्यानमरमधील निवडणुक आयोगाला तशी मागणीदेखील केली होती.

ADVERTISEMENT

भारताच्या सख्खा शेजारी असलेल्या म्यानमारमध्ये प्रदीर्घ काळ लष्करी राजवट होती. ही लष्करी राजवट जुंटा या नावाने ओळखली जाते. 2011मध्ये म्यानमारमध्ये पहिल्यांदा जनतेचं सरकार आलं. त्यामुळे निवडून आलेल्या प्रतिनिधींना सत्तेत जाण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर अवघ्या 9 वर्षात म्यानमारमध्ये लष्करी राजवट सुरु झाली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT