नागपूरमध्ये प्राचार्यांच्या अपहरणाने खळबळ, ३० लाखांची खंडणी, पोलिसांना कुणावर आहे संशय?
नागपूर येथील एका शाळेच्या प्राचार्याचं अपहरण अपहरण झाल्याची समोर आली आहे. शहरातील महात्मा गांधी प्रायमरी शाळेचे प्राचार्य प्रदीप मोतीराम रमानी यांचं अज्ञात व्यक्तींनी अपहरण केलं आहे. सोडून देण्याच्या मोबदल्यात 30 लाख रुपयांची खंडणी देखील मागण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. अपहरणाची घटना शुक्रवारी रात्री घडल्याचं कळतंय. फोनवरून मागितली 30 लाखांची […]
ADVERTISEMENT

नागपूर येथील एका शाळेच्या प्राचार्याचं अपहरण अपहरण झाल्याची समोर आली आहे. शहरातील महात्मा गांधी प्रायमरी शाळेचे प्राचार्य प्रदीप मोतीराम रमानी यांचं अज्ञात व्यक्तींनी अपहरण केलं आहे. सोडून देण्याच्या मोबदल्यात 30 लाख रुपयांची खंडणी देखील मागण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. अपहरणाची घटना शुक्रवारी रात्री घडल्याचं कळतंय.
फोनवरून मागितली 30 लाखांची खंडणी
संपूर्ण प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, महात्मा गांधी शाळेचे प्राचार्य रमानी हे शुक्रवारी घरून काही कामानिमित्त आपल्या मोटारसायकलवरून बाहेर पडले होते. मात्र उशिरा रात्री देखील ते घरी परतले नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते. त्यांच्या मुलीने जेव्हा त्यांच्या नंबरवर फोन केला तेंव्हा अज्ञात व्यक्तीने फोन उचलला आणि रमानी त्यांच्या ताब्यात असल्याचं सांगितलं. परत पाठवण्याच्या बदल्यात त्यांनी 30 लाख रुपयांची मागणी केली, तसंच पोलिसांना न सांगण्याची धमकी दिली.
अपहरणाबाबत कळताच कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठले