मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग बेल्जियममधे, संजय निरूपम यांचा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे बेल्जियममधे आहेत असा आरोप आता काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला आहे. संजय निरूपम यांनी एक फोटो ट्विट केला आहे आणि त्यासोबतच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग बेल्जियममधे आहेत असा आरोप केला आहे.

ADVERTISEMENT

काय आहे संजय निरूपम यांचं ट्विट?

परमबीर सिंग यांचा एक फाईल फोटो संजय निरूपम यांनी ट्विट केला आहे. त्यासोबत ते म्हणतात ‘हे आहेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त. यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर हप्तावसुलीचा आरोप केला होता. परमबीर सिंग पाच प्रकरणांमध्ये वाँटेड आहेत. पोलिसांनी म्हटलं आहे की ते फरार आहेत. आता हे समजलं आहे की ते बेल्जियममध्ये आहेत. परमबीर सिंग बेल्जियममध्ये कसे गेले? त्यांना बेल्जियममध्ये सेफली कुणी पाठवलं? आपण अंडरकव्हर पाठवून त्यांना देशात आणू शकत नाही का?’ हे प्रश्न संजय निरूपम यांनी विचारले आहेत आणि परमबीर सिंग बेल्जियमला असल्याचा दावा केला आहे.

हे वाचलं का?

अँटेलिया प्रकरणात जेव्हा सचिन वाझेचं नाव समोर आलं आणि त्यानेच हा सगळा कट रचल्याचं समोर आलं त्यावेळी म्हणजेच मार्च महिन्यात परमबीर सिंग यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलं. पदावरून हटवण्यात आल्यानंतर तीन दिवसातच परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला बार आणि रेस्तराँमधून 100 कोटी रूपये वसूल कर असं टार्गेट दिलं होतं असा धक्कादायक आरोप केला.

Parambir Singh: परमबीर सिंग यांच्याविरोधात आता कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

ADVERTISEMENT

परमबीर सिंग यांनी केलेले हे आरोप त्यावेळी गृहमंत्रीपदावर असलेल्या अनिल देशमुख यांनी फेटाळले. हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं. बॉम्बे हाय कोर्टाने एप्रिल महिन्यात या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच परमबीर सिंग हे सुट्टीवर गेले. तब्बेतीचं कारण देऊन त्यांनी ही सुट्टी घेतली. मात्र तेव्हापासून ते समोर आलेले नाहीत.

ADVERTISEMENT

दोन दिवसांपूर्वीच ठाणे कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीन पात्र वॉरंटही काढलं आहे. परमबीर सिंग यांच्यावर मुंबई, ठाण्यात पाच केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये त्यांच्यावर खंडणी मागितल्याचा आणि धमकावल्याचा आरोप आहे. परमबीर सिंग देशाबाहेर गेले आहेत असा संशय तपासयंत्रणांनाही होताच. त्यानंतर राज्य सरकारनेही कोर्टात ही माहिती दिली. आता संजय निरूपम यांनी हा दावा केला आहे की परमबीर सिंग हे बेल्जियममध्ये आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT