बारामतीमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना; गोबर गॅसच्या चेंबरमध्ये चौघांचा मृत्यू
Baramati News : बारामती : येथून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गोबर गॅसची टाकी साफ करण्यासाठी चेंबरमध्ये उतरलेल्या चौघांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. बारामती (Baramati) तालुक्यातील खांडज येथे घडलेल्या या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा आणि शेजाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (Four suffocated to death in dung […]
ADVERTISEMENT
Baramati News :
ADVERTISEMENT
बारामती : येथून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गोबर गॅसची टाकी साफ करण्यासाठी चेंबरमध्ये उतरलेल्या चौघांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. बारामती (Baramati) तालुक्यातील खांडज येथे घडलेल्या या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा आणि शेजाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (Four suffocated to death in dung gas chamber in Baramati)
याप्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खांडज परिसरात एका शेतामध्ये गोबर गॅसचा चेंबर आहे. या चेंबरमधून विद्युत मोटारीच्या साह्याने काही शेतकरी शेण मिश्रीत पाणी शेतीला देत होते. सकाळी या मोटरीमध्ये कचरा अडकल्याचा संशयावरून प्रवीण भानुदास आटोळे हे चेंबरमध्ये उतरले. बऱ्याच वेळानंतर देखील ते परत बाहेर न आल्याने त्यांचे सहकारी भानुदास आनंदराव आटोळे हे चेंबरमध्ये उतरले.
हे वाचलं का?
मात्र, दोघेही बराच वेळ होऊ नये बाहेर न आल्याने प्रकाश सोपान आटोळे हे चेंबर मध्ये उतरले. या तिघांचा शोध घेण्यासाठी बापूराव लहुजी गव्हाणे हे चेंबरमध्ये उतरले. मात्र चौघांचाही श्वास गुदमरू लागला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी जेसीबीच्या मदतीने या चौघांना बाहेर काढले आणि बारामतीच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप यांनी जाहीर केले.
Crime: पिंपरीतील कुख्यात गुंड बाळा वाघेरेला पोलिसांनी घरातून उचललं, नेमकं प्रकरण काय?
ADVERTISEMENT
स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, जनावरांचे मलमूत्र आणि मूत्र विसर्जित करण्यासाठी हे चेंबर शेतात बनवले होते. या चेंबरची लांबी 20 फुटांपेक्षा जास्त आहे. चेंबरमधून पावसाचे पाणी वाहून नेण्याची व्यवस्थाही होती. गेल्या काही दिवसांपासून हे चेंबर अधिकच संथ झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे विद्युत मोटारीच्या साहाय्याने मलमूत्र असलेले पाणी बाहेर काढून उसाच्या शेतात सोडण्याची तयारी सुरू होती. मोटारीत कचरा असण्याची शक्यता असताना प्रवीणने सर्वप्रथम या चेंबरमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर एकमेकांना वाचवण्यासाठी ते चेंबरमध्ये घुसले आणि चेंबरमध्ये तयार झालेल्या मिथेन वायूमुळे गुदमरून चौघांचाही मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT