Foxconn-vedanta : व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीवरील ‘तो’ मेसेज गोंधळ निर्माण करण्यासाठी; आदित्य ठाकरेंचा खुलासा
फॉक्सकॉन-वेदांता समुहाचा सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये होणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या वादानंतर सुभाष देसाईंचं एक जून विधान व्हायरल केलं जात आहे. त्यावर आदित्य ठाकरेंनी खुलासा केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, “राज्याचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि आम्ही एक महत्त्वचा विषय समोर आणला. त्यावर या सरकारकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला […]
ADVERTISEMENT

फॉक्सकॉन-वेदांता समुहाचा सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये होणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या वादानंतर सुभाष देसाईंचं एक जून विधान व्हायरल केलं जात आहे. त्यावर आदित्य ठाकरेंनी खुलासा केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, “राज्याचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि आम्ही एक महत्त्वचा विषय समोर आणला. त्यावर या सरकारकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. एक लाख नोकऱ्या उपलब्ध करुन देणारा प्रोजेक्ट गुजरातमध्ये कसा गेला यावर कोणताही खुलासा न करता आरोप केले जात आहेत”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर तोफ डागली.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट आणू असं सांगितलं जातंय, पण हा प्रोजेक्ट गुजरातला का गेला यावर उत्तर दिलं गेलेलं नाही. सरकारकडून स्पष्ट उत्तर येईल, असं वाटलं होतं पण सरकारकडून उत्तर न येता व्हॉट्सअप युनिर्व्हसिटीवरून वेगळ्या गोष्टी येताहेत”, अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी मांडली.
“२०१५०-१६चा मॅग्नेटिक महाराष्ट्रातील फॉक्सकॉनसोबतचा जो सामंजस्य करार होता. त्याबद्दल एक मेसेजे व्हॉट्सअप वरून फिरवला जात आहे. लोकांमध्ये यावरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मॅग्नेटिक महाराष्ट्रातील फॉक्सकॉन सोबत जो करार झाला होता, तो अॅपलच्या असेंबलिंग संदर्भातील होता. महाराष्ट्रासाठी होता. त्या सामंजस्य कराराचं पुढे काय झालं, हे त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं”, असं आदित्य ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.