गीताला महाराष्ट्रात सापडली तिची खरी आई, पाकमधील संस्थेचा दावा
मुंबई: पाकिस्तानमधून परतलेल्या गीता हिला अखेर पाच वर्षांनी तिची खरी आई आणि तिचे कुटुंबीय सापडले आहेत. गीता ही एक मराठी कुटुंबातील मुलगी असल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानमधून 2015 साली भारतात परतलेल्या गीताला अखेर तिची खरी आई सापडली आहे. खरं तर गीता ही मूक-बधिर तरुणी आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांना शोधण्यात आजवर बऱ्याच अडचणी येत होत्या. पण […]
ADVERTISEMENT

मुंबई: पाकिस्तानमधून परतलेल्या गीता हिला अखेर पाच वर्षांनी तिची खरी आई आणि तिचे कुटुंबीय सापडले आहेत. गीता ही एक मराठी कुटुंबातील मुलगी असल्याचं समोर आलं आहे.
पाकिस्तानमधून 2015 साली भारतात परतलेल्या गीताला अखेर तिची खरी आई सापडली आहे. खरं तर गीता ही मूक-बधिर तरुणी आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांना शोधण्यात आजवर बऱ्याच अडचणी येत होत्या. पण पाकिस्तानात गीताचा सांभाळ ज्या सेवाभावी संघटनेने केला त्याच संस्थेने हा दावा केला आहे. गीताला तिची खरी आई आणि तिचं संपूर्ण कुटुंब हे महाराष्ट्रात सापडलं आहे.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानाच्या ईधी वेल्फेअर ट्रस्टच्या बिलकिस ईधी यांनी दावा केला आहे की, गीता हिला तिचे खरे कुटुंबीय महाराष्ट्रात सापडले आहेत. बिलकिस यांनी याबाबत अशी माहिती दिली की, गीता ही माझ्या संपर्कात होती आणि याच आठवड्यात तिला तिची खरी आई सापडल्याची माहिती तिने मला दिली. बिलकिस यांच्या मते, गीता हिचं खरं नाव राधा वाघमारे असं असून ती महाराष्ट्रातील नायगावमधील मराठी कुटुंबातील मुलगी आहे.
दिवंगत पराराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या अथक प्रयत्नामुळे चुकून पाकिस्तानात पोहचलेली गीता अनेक वर्षाने भारतात 2015 साली परतली होती. भारतात परतल्यापासून तिच्या खऱ्या कुटुंबीयांचा शोध सुरु होता. जो आता पूर्ण झाला आहे.