गोव्याच्या ‘राज ठाकरें’चा वाघ आता विधानसभेत, म्हणाले तो गरजणार…
पणजी: गोव्यात पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीने निवडणूक लढवली आणि पहिल्याच फटक्यात त्यांचा एक आमदार विधानसभेत दाखल होणार आहे. या संपूर्ण निवडणुकीत रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीची कामगिरी ही खूपच चांगली असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आता गोव्याच्या राजकारणात रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीचे विरेश बोरकर हे पहिल्यांदाच निवडून गेले […]
ADVERTISEMENT
पणजी: गोव्यात पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीने निवडणूक लढवली आणि पहिल्याच फटक्यात त्यांचा एक आमदार विधानसभेत दाखल होणार आहे. या संपूर्ण निवडणुकीत रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीची कामगिरी ही खूपच चांगली असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आता गोव्याच्या राजकारणात रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
ADVERTISEMENT
रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीचे विरेश बोरकर हे पहिल्यांदाच निवडून गेले आहेत. अवघ्या 27 वर्षीय विरेश बोरकर हे सांत आंद्रे मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी अवघ्या 76 मतांनी विजय भाजपच्या उमेदवारावर विजय मिळवला आहे. मात्र हा विजय रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीसाठी मोठा मानला जात आहे.
सांत आंद्रे मतदारसंघात खरं तर फारच अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. मात्र, अखेर शेवटच्या फेरीत विरेश बोरकर यांनी बाजी मारली. यावेळी विरेश बोरकर यांना 5292 मतं मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे फ्रान्सिको सिल्व्हेरिया हे होते. त्यांना 5109 मतं मिळाली. त्यामुळे विरेश बोरकर यांचा अवघ्या 76 मतांनी विजय झाला आहे.
हे वाचलं का?
दरम्यान, सांत आंद्रे मतदारसंघातील रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीचे विजयी उमेदवार विरेश बोरकर म्हणाले की, ‘आम्ही पैसे आणि पॉवरशिवाय विजयी झालो आहेत.’
दुसरीकडे रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीचे प्रमुख मनोज परब यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला आहे. गोव्यात नवा पर्याय देणारे मनोज परब हे निवडून येतील असा अनेक जण अंदाज वर्तवत होते. मात्र, असं असलं तरीही मनोज परब यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. याशिवाय रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीचे जवळजवळ 9 उमेदवार हे अत्यंत कमी फरकाने पराभूत झाले आहेत. त्यामुळे रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टी आगामी काळात गोव्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
ADVERTISEMENT
Goa Election Result 2022 LIVE Updates: गोव्यात भाजपला घवघवीत यश, लवकरच करणार सत्ता स्थापनेचा दावा
ADVERTISEMENT
गोव्याची सत्ता पुन्हा भाजपकडेच..
दुसरीकडे गोव्यात भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. भाजपने सलग तिसऱ्यांदा गोव्याची सत्ता काबीज केली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप हे बहुमताच्या अगदी जवळ पोहचले आहेत. त्यामुळे आता लवकरच भाजपकडून सत्तास्थापनेचा दावाही करण्यात येणार आहे. भाजपला जवळजवळ 20 जागांवर विजय मिळविण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप हे बहुमताचा आकडा गाठत असल्याचं दिसत आहे. मात्र, असं असलं तरीही गोव्यात स्थिर सरकार असावं यासाठी भाजप इतरही काही पक्षांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT