ऐकावं ते नवलंच! १८ वर्षांची मुलगी पडली ४६ वर्षांच्या व्यक्तीच्या प्रेमात; आता आहे २ मुलांची आई
कधी कुणावर जीव जडेल सांगता येत नाही. असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. एका २२ वर्षाच्या मुलीने ५० वर्ष वय असलेल्या व्यक्तीशी संसार थाटला आहे. लग्नानंतर दोघं आनंदी असले, तरी सार्वजनिक जीवनात मात्र, त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोघांच्या वयामध्ये फार मोठं अंतर असल्याने लोकांना ते बापलेक असल्याचा गैरसमज होतोय. दोघांच्या वयामध्ये […]
ADVERTISEMENT

कधी कुणावर जीव जडेल सांगता येत नाही. असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. एका २२ वर्षाच्या मुलीने ५० वर्ष वय असलेल्या व्यक्तीशी संसार थाटला आहे. लग्नानंतर दोघं आनंदी असले, तरी सार्वजनिक जीवनात मात्र, त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोघांच्या वयामध्ये फार मोठं अंतर असल्याने लोकांना ते बापलेक असल्याचा गैरसमज होतोय.
दोघांच्या वयामध्ये २८ वर्षांचं अंतर असल्यानं या तरुणीला सातत्याने लोकांच्या मनात निर्माण होणारा गैरसमज दूर करावा लागत आहेत. त्यामुळेच तिला कधी ‘ते माझे वडिल नाहीत, तर पती आहे’, असं वारंवार लोकांना सांगावं लागत आहे.
एलिझा गेआघन-फोर्ब्स असं या तरुणीचं नाव असून, रिक फोर्ब्स असं तिच्या पतीचं नाव आहे. चार वर्षांपूर्वी दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी विवाहही केला. मात्र, दोघांच्या वयात फार मोठं अंतर असल्यानं त्यांच्यावर वाईट टीकाटिप्पणीही केली जाते. हे जोडप अमेरिकेतील मेन शहरात राहतं.
पेट्रोलपंपावर झाली होती पहिली भेट…