Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस, एकाचा मृत्यू… IMD कडून अलर्ट जारी

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

When rain is expected in Mumbai?
When rain is expected in Mumbai?
social share
google news

IMD Alert On Mumbai Rain : भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह इतर राज्यांना 48 तासांसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या ऑरेंज अलर्टचा अर्थ असा आहे की ज्या राज्यांना ऑरेंज अलर्ट झोनमध्ये ठेवण्यात आले आहे त्यांनी 24 तासांच्या कालावधीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या भागातील लोकांनी काही खबरदारी घ्यावी, असा इशारा दिला जात आहे. पावसाचा सर्वाधिक परिणाम कोकणात होणार आहे. (Heavy rain in Mumbai one death IMD’s orange alert)

ADVERTISEMENT

यादरम्यान, हवामान विभागाने मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबईत गोरेगाव, विलेपार्ले, लोअर परळ, अंधेरीसह शहरातील अनेक भागात संततधार पावसामुळे लोकांची तारांबळ उडालेली आहे.

Pune : तरुणीवर हल्ला! दर्शना पवारचा उल्लेख करत राज ठाकरेंनी कुणाला सुनावलं?

पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ, एकाचा दुर्दैवी मृत्यू!

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, “मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे, त्यामुळे मुंबईवर पावसाची गती वाढली आहे आणि मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे.” अशा स्थितीत मुंबईतील मालाड पश्चिम येथे एका खासगी कंपाऊंडमध्ये पिंपळाचे झाड पडले आणि या घटनेत एका 38 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

ठाण्यात पावसाचा जोर वाढल्याने रेल्वे रूळांवर साचलं पाणी

उशिरा का होईना पावसाने अखेर दमदार हजेरी लावली आहे. सगळीकडे मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशा स्थितीत ठाण्यात पावसाचा जोर वाढला असून दिवसभरात 105.16 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रेल्वे सेवा जरी सुरळीत सुरू असली तरी रेल्वे स्थानकांना याचा फटका बसत आहे. रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे.

NCP: भाकरी फिरवली अन् अजित पवारांचा फोटो गायब, शरद पवारांच्या मनात काय?

मुंबईसह कोणत्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा?

ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे आणि सातारा साठी ऑरेंज अलर्ट तर, पालघर, मुंबई आणि सिंधुदुर्गसाठी गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पाऊस उत्तरेकडे सरकल्याने मुंबई आणि आसपासच्या शहरांसह कोकण भागात मान्सून मुसळधार ते अति मुसळधार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासाठीही सावधानतेचा इशारा दिला जाऊ शकतो.

ADVERTISEMENT

India in World Cup 2023 : विश्व चषक स्पर्धेत भारताला कोणता संघ जाणार जड?

मुंबईत IMD द्वारे पावसाची नोंद!

महाराष्ट्राच्या राजधानीत मंगळवारीही मुसळधार पाऊस सुरूच असून येथे एकूण 104 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात हळूहळू पावसाचा जोर वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले, ‘पाणलोट क्षेत्रात मध्यम पाऊस झाल्याने मुंबईतील नागरिकांना 10 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागेल.’

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT