हिंगोली : राष्ट्रवादीच्या आमदार नवघरेंना धक्का; ग्रामपंचायत निकालात शिंदे-ठाकरे गटाचा डंका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील 6 ग्रामपंचायतींसाठी जाहीर झालेल्या निवडणुकांचा निकाल सोमवारी हाती आला. या सर्व ग्रामपंचायती औंढा-नागनाथ तालुक्यातील आहेत. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांना मोठा धक्का बसला आहे. नवघरे यांच्या वसमत मतदारसंघातील या ग्रामपंचायतींवर शिंदे आणि ठाकरे या शिवसेनेतीलच दोन गटांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

या निकालात औंढा – नागनाथ तालुक्यातील तामटी तांडा आणि पिंपळा या दोन ग्रामपंचायती शिंदे गटाकडे गेल्या आहेत. यातील तामटी तांडा ही ग्रामपंचायत तर बिनविरोध शिंदे गटाकडे आली आहे. तर काठोडा तांडा आणि लक्ष्मीमन नाईक तांडा या ग्रामपंचायती ठाकरे गटाकडे गेल्या आहेत. याशिवाय संघनाईक तांडा ही ग्रामपंचायत स्थानिक आघाडीकडे गेली आहे. चिंचोली निळोबा ही केवळ एक ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे.

निवडणूक आयोगाने 16 जिल्ह्यांमधील 608 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर केल्या होत्या. यातील 51 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध पार पडल्या होत्या. तर 547 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडले होते. यासाठी 66.10 टक्के मतदान पार पडले होते. सोबतच सरपंचपदाच्याही थेट जनतेतून निवडणुका पार पडल्या होत्या.

हे वाचलं का?

मागील काही काळात घडलेल्या राजकीय घडामोडी, शिवसेनेतील फुट आणि सत्तांतरानंतर होत असलेल्या या निवडणुकांच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागले होते. यात हिंगोली जिल्ह्याचे चित्र पाहिल्यास शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाला यश मिळाले असून सरपंचपदीही शिवेसेनेचे दोन, ठाकरे गटाचे दोन, राष्ट्रवादीला एका आणि स्थानिक आघाडीला एका ठिकाणी यश मिळाले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT