homepage_banner

हो मी मिळवला सीडीआर, ज्यांनी खून केला त्याची तर चौकशी करा: फडणवीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मनसुख हिरेन यांच्या फोन कॉलचे डिटेल्स (सीडीआर) विरोधी पक्ष नेत्यांकडे आले कुठून असा प्रश्न काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपस्थित केल्यानंतर विधानसभेत एकच विरोधकांनी एकच गदारोळ केला. यालाच उत्तर देताना फडणवीसांनी सरकारवर देखील गंभीर आरोप केले आहेत. ‘गृहमंत्री माझी चौकशी करा, हो मी मिळवला सीडीआर… अरे ज्यांनी खून केला त्याची तर चौकशी करा, ज्यांनी खून केला त्याला पाठीशी घालता?’ असं म्हणत फडणवीसांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये नेमकं काय घडलं?

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षाने जोरदार लावून धरली आहे. यावरुन सभागृहात प्रचंड गदारोळ घालण्यात आला आहे. मात्र, याचवेळी नाना पटोले यांनी एक असा मुद्दा उपस्थित केला की, ज्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण विरोधी पक्षाने एक गदारोळ घातला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘विरोधी पक्ष नेत्यांकडे सीडीआर आला कुठून, त्यांची चौकशी करा’

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षाने केल्यानंतर नाना पटोले यांनी याबाबत बोलताना असं म्हटलं की, ‘मुकेश अंबानींच्या घराबाहेर या गाड्या जाऊ कशा शकतात. हे कोणी केलं? हा कोणाचा प्लॅन होता? हा सीडीआर विरोधी पक्षनेत्यांकडून कुठून आला?’

ADVERTISEMENT

Sachin Vaze नी माझ्या पतीची हत्या केल्याचा संशय-विमला हिरेन

ADVERTISEMENT

फडणवीसांनी नेमकं काय दिलं उत्तर?

नाना भाऊ मी मिळवला सीडीआर… करा माझी चौकशी, गृहमंत्री माझी चौकशी करा. मी मिळवला सीडीआर… अरे ज्यांनी खून केला त्याची तर चौकशी करा, ज्यानी खून केला त्याला पाठीशी घालता. या सभागृहात आम्हाला बोलायचा अधिकार आहे. धमकी देता का आम्हाला?… आम्ही घाबरत नाही, करा… करा माझी चौकशी करा. जर तुम्ही खुनी खुनी शोधला नाही तर त्याच्या पलिकडची माहिती मिळवीन. तो माझा अधिकार आहे.

सचिन वाझे नेमके आहेत तरी कोण?

सचिन हिंदुराव वाझे हे मूळचे कोल्हापूरचे असून त्यांचा जन्म 22 फेब्रवारी 1972 रोजी झाला. 1990 साली ते पोलीस दलात सामील झाले होते. सुरुवातीला त्यांची नियुक्ती गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात झाली होती. मात्र दोन वर्षातच म्हणजे 1992 साली त्यांची बदली थेट ठाण्यासारख्या शहरी भागात करण्यात आली होती. ठाण्यात बदली होऊन आल्यानंतर त्यांनी आपल्या धडाकेबाज कामगिरीला सुरुवात केली त्यामुळे ते नेहमीच चर्चेत होते. दरम्यान, एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि दया नायक यांच्या टीममध्ये सचिन वाझे यांचा समावेश करण्यात आला होता.

“अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ चार महिने सचिन वाझेंकडे”

आपल्या 30 वर्षाच्या कार्यकाळात सचिन वाझे यांनी 63 गुन्हेगारांचं एन्काउंटर केलं आहे. त्यामुळे एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी त्यांची पोलीस दलात ओळख निर्माण झाली होती. मुन्ना नेपाळी या कुप्रसिद्ध गुंडाचा खात्मा सचिन वाझे यांनीच केला होता. तेव्हापासून सचिन वाझे हे खूपच चर्चेत आले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT