उद्धव ठाकरे युतीसाठी तयार होते मात्र संजय राऊत यांनी खोडा घातला”; राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट
शिवसेनेच्या १२ खासदारांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. गटनेता बदलावा असं पत्र आज या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना दिलं आहे. राहुल शेवाळे यांची निवड त्यांनी गटनेता म्हणून केला आहे. यावेळी संजय राऊत यांच्यावर एक गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केला. संजय राऊत यांच्याविषयी काय म्हणाले आहेत राहुल शेवाळे? भाजप आणि शिवसेना यांची युती होण्याची […]
ADVERTISEMENT

शिवसेनेच्या १२ खासदारांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. गटनेता बदलावा असं पत्र आज या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना दिलं आहे. राहुल शेवाळे यांची निवड त्यांनी गटनेता म्हणून केला आहे. यावेळी संजय राऊत यांच्यावर एक गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केला.
संजय राऊत यांच्याविषयी काय म्हणाले आहेत राहुल शेवाळे?
भाजप आणि शिवसेना यांची युती होण्याची चर्चा सुरू झाली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युतीसाठी तयारही होते. मात्र खासदार संजय राऊत यांनी युतीत खोडा घातला असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला. युती करण्यात यावी यासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो होतो. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यातही एक तास चर्चा झाली होती.
उद्धव ठाकरे तसंच पंतप्रधानर नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाल्यानंतर आमची एक बैठक पार पडली. त्या बैठकीत अरविंद सावंत, संजय राऊत उपस्थित होते. यावेळी मलाही युती करायची आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तसंच तुम्हीही युतीसाठी प्रयत्न करा, असं ठाकरे यांनी सांगितलं होतं. मात्र संजय राऊत आणि त्यांनी केलेली वक्तव्यं युतीत खोडा घालणारी ठरली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही युती करण्याबाबत फारसा प्रतिसाद दिला नाही असंही शेवाळे यांनी सांगितलं.