Narayan Rane: ‘मी स्वत: जाणार राणाच्या घरी, राणाला बाहेर काढणार..’, राणेंचं सेनेला खुलं आव्हान
मुंबई: अमरावतीचे खासदार आणि आमदार नवनीत आणि रवी राणा यांच्या बचावासाठी स्वत: भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पुढे सरसावले आहेत. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपण स्वत: राणा दाम्पत्याला बाहेर काढायला जाणार आहोत असं म्हणत थेट शिवसेनेला आव्हान दिलं आहे. शिवसेना जाणूनबुजून राणा दाम्पत्याविरोधात कारवाई करत आहेत. असा थेट आरोप देखील यावेळी नारायण […]
ADVERTISEMENT
मुंबई: अमरावतीचे खासदार आणि आमदार नवनीत आणि रवी राणा यांच्या बचावासाठी स्वत: भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पुढे सरसावले आहेत. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपण स्वत: राणा दाम्पत्याला बाहेर काढायला जाणार आहोत असं म्हणत थेट शिवसेनेला आव्हान दिलं आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना जाणूनबुजून राणा दाम्पत्याविरोधात कारवाई करत आहेत. असा थेट आरोप देखील यावेळी नारायण राणे यांनी केली आहे. या सगळ्यामुळे महाराष्ट्र हा राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने जात आहे. शिवसेनेने बॅग भरली आहे. असंही वक्तव्य यावेळी राणेंनी केलं आहे.
पाहा नारायण राणे पत्रकार परिषदेत काय म्हणाले:
हे वाचलं का?
‘संजय राऊत, अनिल परब यांना मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा आहे याचं भान आहे की नाही हा प्रश्न आहे. सत्ता असतानाही ते चँलेज देतायेत.. अनिल परब म्हणतात जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत राणा कुटुंबीयांना आम्ही जाऊ देणार नाही. हे सर्व पाहत असताना या धमक्या ऐकत असताना राज्यात पोलीस ही व्यवस्था आहे की नाही हा प्रश्न आहे.’
‘ज्यांच्याकडे सत्ता आहे ते म्हणतायेत माफी मागितली नाही तर घरातून बाहेर पडू देणार नाही. असं म्हणणं हा काही गुन्हा नाही? काय करतायेत पोलीस? शिवसेना नेते सांगत होते की, राणा कुटुंबीयांना मुंबईत येऊ देणार नाही. अमरावतीच काय मातोश्रीच्या दरवाज्यात आल्या आणि बसल्या. कुठे होती शिवसेना.. झोपली होती का? काय येऊ देणार नाही..’
ADVERTISEMENT
‘संजय राऊत बढाया मारतो.. शिवसेना हे करेल ते करेल.. हजारो शिवसैनिक मातोश्रीवर जमले आहेत. २३५ च्या पुढे एकही नाही. मी मोजायला मुद्दाम सांगितलं इथे येण्यापूर्वी. आणि राणाच्या घरासमोर 125..’
ADVERTISEMENT
‘मी तुम्हाला आत्ताच सांगतो. जर पोलिसांनी हस्तक्षेप करुन राणा कुटुंबीयांना घराच्या बाहेर पडणार असतील तर त्यांना जाऊ द्या. त्यांना कोणी अडवलं, जाऊ दिलं नाही तर काही काळानंतर मी स्वत: जाणार राणाच्या घरी. राणाला बाहेर काढणार.. बघूया कोण येतं तिकडं. मर्द आहेत ना.. या म्हणावं तिकडे.. नाहीतर त्या अगोदर पोलिसांनी त्यांना बाहेर काढावं.’
Navneet Rana : मुंबई पोलीस नवनीत राणांच्या घरात; ताब्यात घेण्यावरून नाट्यमय घडामोडी
‘काय घाबरट आहेत ओ.. शिवसैनिक… खार पोलीस स्टेशनला गेले. काय म्हणे त्यांना माफी मागायला सांगा.. अरे कशाची केस त्यांच्यावर.. एक खासदार, आमदार लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या जीविताला काही झालं या मुंबईत राज्य सरकार जबाबदार राहील.’
‘बघतो किती वाजेपर्यंत जाऊ देत नाही. मी इथून गेल्यावर राणाला फोन करणार मदत पाहिजे मी येतो.. बघू कोण अडवतो.. कसले शिवसैनिक मी पाहिलेत ओ.. स्वत: पुळचट हा काय सांगतो शिवसेनेचा इतिहास.. सामनात आला नोकरीसाठी आणि पगारी नेता झाला.’ अशी तुफान टीका नारायण राणेंनी शिवसेनेवर यावेळी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT