अनैतिक संबंध, विवाहित प्रेयसी अन् एका हत्येचा ‘विषारी’ कट!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

झुंझनू (राजस्थान): सुप्रीम कोर्टाकडून एखाद्या आरोपीचा जामीन अर्ज नाकारलं जाणं ही काही छोटी बाब नाही. जेव्हा सत्र न्यायालय आणि हायकोर्ट यांच्याकडून जामीन अर्ज फेटाळला जातो तेव्हाच प्रकरण हे सुप्रीम कोर्टात पोहचतं. असं त्यावेळीच होतं जेव्हा एखादं प्रकरण अतिशय भयंकर असतं. राजस्थानच्या झुंझनूमध्ये एका महिलेच्या हत्येचं एक प्रकरणही असंच विचित्र आणि धक्कादायक आहे.

ADVERTISEMENT

2 जून 2019, झुंझनू, राजस्थान

नेहमीप्रमाणे 2 जून 2019 रोजी रात्रीच्या जेवणानंतर सुबोध देवी ही तिच्या खोलीत झोपायला गेली. पण ती सकाळी उशिरापर्यंत ती आपल्या खोलीतून बाहेरच आली उठली नाही. दरम्यान, आपली सासू अद्यापही का उठली नसावी हे पाहण्यासाठी तिची त्याची सून अल्पना तिला उठवण्यासाठी सासूच्या खोलीत गेली पण आतलं दृश्य पाहून ती अक्षरश: किंचाळली. कारण यावेळी तिची सासू बेडवर बेशुद्ध पडली होती आणि खोलीच्या कोपऱ्यावर एक विषारी साप फणा काढून बसला होता.

हे वाचलं का?

त्यामुळे तिने लागलीच संपूर्ण प्रकाराची माहिती आपल्या शेजाऱ्यांना दिली. शेजाऱ्यांनी सुबोध देवीला शुद्धीत आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिच्या शरीराची काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दुसरीकडे, सुबोध देवीच्या खोलीत जो साप होता तो एका सर्पमित्रांच्या मदतीने पकडण्यात आला आणि त्याला दूर नेऊन सोडण्यात आलं. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण फक्त साप चावल्यामुळे मृत्यू झाल्याचं होतं. दरम्यान, सुबोध देवीचा मुलगा जो लष्करात आहे आणि पती हे परत आल्यानंतर तिच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले.

ADVERTISEMENT

घरातील इतर लोकांबरोबरच पोलिसांनीही या प्रकरणाला अपघाती मृत्यू समजून या प्रकरणाची फाईल बंद केली होती. पण एक महिन्यानंतर सुबोध देवीच्या कुटुंबीयांनी जे काही समजलं त्याने त्यांना फारच धक्का बसला.

ADVERTISEMENT

खरं तर सुबोध देवीची सून अल्पना फोनवर कुणाला तरी सांगत होती की, सुबोध देवीच्या मृत्यूच्या दिवशी तुला आणि तुझ्या मित्राला कोणी पाहिले तर नाही ना? कारण जर कोणी तुम्हाला पाहिले असेल तर मोठा गोंधळ होऊ शकतो. फक्त ही एकच गोष्ट आणि ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळाली. याप्रकरणी सुबोध देवीचा पती आणि अल्पनाचा सासरा राजेश यांनी आपल्या पत्नीच्या मृत्यूबाबत पोलिसात नव्याने तक्रार दाखल केली आणि आपल्या पत्नीची हत्या सुनेनेच केली अशी नवी तक्रार पोलिसात दाखल केली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास नव्याने सुरू करण्यात आला.

सासूच्या मृत्यूच्या दिवशी अल्पनाचा प्रियकराला तब्बल 124 वेळा फोन

दरम्यान, तपासात पोलिसांना असे आढळून आले की सुबोध देवीची सून अल्पना हिचेही मनीष मीणा नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. आणि बऱ्याचदा अल्पनाचं यावरुनच तिच्या सासू-सासऱ्यांशी भांडण व्हायचं. त्यामुळे पोलिसांनी हा संपूर्ण तपास अल्पना हिला केंद्रस्थानी सुरु ठेवूनच केला. तपासादरम्यान, जेव्हा पोलिसांना अल्पनाच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स मिळाले, तेव्हा रेकॉर्ड पाहून त्यांनागी धक्का बसला. दरम्यान, 2 जून 2019 रोजी म्हणजेच ज्या दिवशी तिची सासू सुबोध देवी मरण पावली त्याच दिवशी अल्पा हिने तिचा प्रियकर मनीष मीणाशी मोबाईलवरुन तब्बल 124 वेळा, तर मनीषचा मित्र कृष्णासोबत 19 वेळा संवाद साधला होता.

आता अल्पना सोबत तिचा प्रियकर मनीष सुद्धा पोलिसांच्या रडारवर आला होता. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली. या चौकशीत मनीषने सांगितलेली कहाणी सगळ्यांनाच धक्का बसला. मनीषने पोलिसांसमोर कबूल केले त्याने आपल्या प्रेयसीच्या सासूची हत्या केली. सर्पदंश करवून ही हत्या करण्यात आली.

वास्तविक, अल्पनाची सासू ही दोघांमधील अनैतिक संबंधांबाबत प्रचंड संतापली होती. त्यामुळे तिने आपल्या सुनेला असंही म्हटलं होतं की, ती आता सगळ्याबाबत आपल्या मुलाला सांगणार आहे. त्यामुळेच अल्पना आणि मनीष यांनी सुबोध देवीला मारण्याचा कट रचला.

वास्तविक, अल्पना ही या कुटुंबातील मोठी सून होती. तिचा विवाह 12 डिसेंबर 2018 रोजी घरचा मोठा मुलगा सचिनसोबत झाला होता. सचिन हवाई दलात आहे आणि त्याची पोस्टिंग राजस्थानच्या बाहेर होती. तर अल्पना आणि तिचा प्रियकर मनीष शाळेच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते. पण, लग्नानंतर अल्पना पुन्हा एकदा मनीषच्या जवळ आली होती आणि दोघेही फोनवर तासंतास बोलत असायचे.

कधीकधी ते एकमेकांना गुपचूप भेटायचे देखील. जेव्हा अल्पनाच्या सासूला याबाबत समजलं तेव्हा तिने अल्पनाला याबाबत बोलण्यास सुरुवात केली. इथूनच अल्पानाने तिच्या सासूला मारण्याचा कट रचण्यास सुरुवात केली. सर्पदंश करवून तिला सासूची हत्या घडवून आणायची होती. जेणेकरुन तिच्या या कृत्याबाबत कुणालाही शंका येऊ नये.

2 जून 2019 रोजी, अल्पाने तिच्या सासूला रात्री बनाना शेकमधून झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या. दुसरीकडे, ठरलेल्या कटानुसार मनीष रात्रीच्या वेळी विषारी साप घेऊन गुपचूप अल्पनाच्या घरी पोहोचला. मनीषने हा साप एका व्यक्तीकडून दहा हजार रुपयांना विकत घेतला होता. फक्त अल्पनाच्या सासूच्या हत्येसाठी. दरम्यान, खोलीत पोहचल्यावर दोघांनाही असे वाटले की सर्पदंशाने जर सासूचा मृत्या झाला नाही तर? त्यामुळे त्यांनी उशी तोंडावर दाबून सुबोधची हत्या केली. नंतर विषारी साप सोडून ते खोलीतून निघून गेले.

ठरलेल्या कटानुसार सकाळी अल्पानाने सासूला साप चावला असल्याचा जोरदार कांगावा केला. सुमारे महिनाभर हा संपूर्ण कट खरा असल्याचेच सगळ्यांना वाटले. परंतु जेव्हा अल्पाना फोनवर तिच्या प्रियकराशी बोलत असल्याचं सासऱ्यांनी ऐकलं तेव्हा तिचा संपूर्ण कट उघडकीस आला.

आतापर्यंत करण्यात आलेल्या चौकशीत मनीषसह अल्पानाने देखील तिच्या गुन्ह्याची कबुली दिली होती. या दोघांसह त्यांचा आणखी एक साथीदार कृष्णालाही पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे. दुसरीकडे, सुमारे एक महिन्यानंतर, जेव्हा या संदर्भात एफआयआर नोंदवण्यात आला तेव्हा पुन्हा नव्याने तपास सुरू झाला, तेव्हा पोलिसांनी अंत्य संस्कारानंतर सुबोधची जी काही हाडं उरली होती ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली.

या तपासात सुबोधच्या शरीरात सापाचं विष आढळून आलं. म्हणजेच एकीकडे उशी दाबून सुबोधची हत्या जरी करण्यात आली तरीही त्या रात्री खोलीत सोडलेल्या विषारी सापाने देखील सुबोध देवीला दंश केला होता. दरम्यान मनीषच्या मित्र कृष्ण कुमारने जामीन अर्ज दिला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने त्याचा देखील जामीन अर्ज फेटाळून लावला.

अनैतिक संबंध सुरु असतानाच वृद्ध महिलेने ठोठावला दरवाजा, आरोपीने केली हत्या

कोर्टाच्या दृष्टीने ही काही क्षुल्लक बाब नाही. या प्रकरणातील तीन आरोपी सध्या जेलमध्ये आहेत, पण लोक त्या क्षणाची वाट पाहत आहेत. जेव्हा तिघांनाही दोषी घोषित केले जाईल आणि खुनाच्या या विचित्र प्रकरणात, तिघांनाही कठोर शिक्षा होईल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT