Rain Latest Update : अतिमुसळधार पावसाचा इशारा, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, पश्चिम किनार्यावरील द्रोणीय स्थितीमुळे पुढील ४-५ दिवसात मुंबई, ठाण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होत असून, पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. हवामान विभागाकडून पुढील तीन ते चार […]
ADVERTISEMENT

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, पश्चिम किनार्यावरील द्रोणीय स्थितीमुळे पुढील ४-५ दिवसात मुंबई, ठाण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार आहे.
राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होत असून, पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. हवामान विभागाकडून पुढील तीन ते चार दिवसांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे पालघर, नाशिक, रायगड, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, गडचिरोली या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी आयएमडीकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.