अपहरण करुन मामाला जंगलात फेकलं, भाच्याचं विचित्र कृत्य
मुंबई: आपल्याच मामाचं अपहरण करुन त्याला जंगलात फेकून देणाऱ्या भाच्यासह त्याच्या 5 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. पैशाच्या व्यवहारामुळे भाच्याने आपल्या साथीदारांसह मामाचे हात-पाय बांधून त्याला जंगलात फेकून दिल्याची घटना घडली समोर आली आहे. ही घटना दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी आरोपी भाचा वनवेश्वर मंडल आणि इतर पाच मित्रांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा […]
ADVERTISEMENT

मुंबई: आपल्याच मामाचं अपहरण करुन त्याला जंगलात फेकून देणाऱ्या भाच्यासह त्याच्या 5 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. पैशाच्या व्यवहारामुळे भाच्याने आपल्या साथीदारांसह मामाचे हात-पाय बांधून त्याला जंगलात फेकून दिल्याची घटना घडली समोर आली आहे. ही घटना दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी आरोपी भाचा वनवेश्वर मंडल आणि इतर पाच मित्रांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भाच्याने त्याच्या मामाचं (जिनियल सबरा) दहिसर येथील कुबेर पॅलेस येथून अपहरण केलं होतं. सुरुवातीला त्याने आपल्या मामाला एका टेम्पोमध्ये टाकलं आणि नंतर त्याचे हात-पाय बांधले तसंच तोंडात कापडाचा बोळा देखील टाकला. जेणेकरुन त्याने आरडाओरड करु नये. यानंतर या सगळ्यांनी त्याला आनंद नगरमधील जंगल परिसरात टाकून दिलं आणि ते तिथून फरार झाले.
दरम्यान, जंगलात टाकून दिलेलं असताना देखील जिनियल सबरा हा न घाबरता रांगत-रांगत मुख्य रस्त्यापर्यंत आला. याचवेळी या भागातून जाणाऱ्या एका महिलेने त्याला त्या अवस्थेत पाहिलं आणि तिने तात्काळ याबाबतची माहिती पोलीस कंट्रोल रुमला दिली. पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित व्यक्तीची सुटका केली आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं.
दुसरीकडे अपहरण केल्याप्रकरणी आरोपी वनवेश्वर याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन अवघ्या काही तासात त्याच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्याच्या 5 मित्रांना देखील अटक करण्यात आली.