इंदापूर: टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इंदापूर: गावातील टवाळ मुलांच्या छेडछाडीला कंटाळून एका नववीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील बोरी या गावात बुधवारी सायंकाळी ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

सिद्धी गजानन भिटे असे या अल्पवयीन मुलीचे नाव असून ती बोरी गावातील हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होती. शाळेत जात असताना गावातील 3 टवाळखोर मुले तिची सतत छेड काढत होते. त्यांच्या याच छेडछाडीला कंटाळून सिद्धीने आत्महत्या केल्याचं यावेळी समोर आलं आहे.

टवाळखोर मुलांच्या छेडछाडीला कंटाळून सिद्धीने बुधवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने सुसाइड नोटही लिहली होती. ज्यामध्ये असं लिहलं आहे की, ‘मला माहित आहे माझं चुकतंय, पण आई-वडिलांच्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.

हे वाचलं का?

याप्रकरणी आत्महत्या केलेल्या सिद्धीचे वडील गजानन भिटे यांनी भवानीनगर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार गणेश संतोष कुचेकर, यश अरुण गरगडे आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालपणीचा मित्रच निघाला नराधम; विवाहित शिक्षिकेवर बलात्कार, नागपूरमधली धक्कादायक घटना

ADVERTISEMENT

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आता या प्रकरणाचा तपास फौजदार नितीन लकडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

फॅशनेबल राहणं नागरिकांना नव्हतं पसंत, छेडछाडीला कंटाळून 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मालेगावमध्ये देखील अशीच घटना घडली. मालेगाव शहरातील जाफरनगर भागात राहणाऱ्या आशिया मोहंमद कासीम या 20 वर्षीय तरुणीने गल्लीतील उड्डाणटप्पू युवकाच्या एकतर्फी प्रेम व छेडछाडीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

गेल्या अनेक महिन्यांपासून एक युवक तरुणीस ब्लॅकमेल करून लग्न करण्यासाठी जबरदस्ती करीत होता. या मुलाच्या सोबत असलेल्या काही गुंडांनी मुलीच्या घरावर हल्लाही केल्याची तक्रार नातेवाईकांनी केली होती. शहरातील जाफर नगर भागात राहणाऱ्या आशिया आणि जाफरीन या दोन भगिनी स्वतः शिक्षित आणि समाजाच्या रूढी परंपरेव्यतिरिक्त राहणं पसंत करणाऱ्या मुली होत्या.

शहरातील एका भागात त्यांचे ब्युटीपार्लर देखील आहे. त्यांच्या या फॅशनेबल राहणीमान आणि सुंदरतेवर गल्लीतील टवाळखोर मुलांची वक्रदृष्टी पडली आणि दोघींची छेडछाड सुरू झाली.

छेडछाडीची तक्रार पोलिसांना व गल्लीतील लोकांना करण्यात आली. तुम्ही फॅशनेबल का राहता? असा उलट सवाल त्यांना करण्यात आला होता. यावेळी त्यांच्या गल्लीतील लोकांनी या दोन्ही बहिणींना साथ दिली नाही. त्या दोघींना कोणीही पाठिंबा न दिल्याने त्या हतबल झाल्या. कुणीच आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्यास साथ देत नाही या भावनेतून अखेर आशियाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होतं. याप्रकरणी आता पोलिसात गुन्हाही दाखल झाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT