महाराष्ट्रात सलग तीन दिवस पॉझिटिव्ह कोरोना रूग्णसंख्येत घट, 26 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 2026 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 26 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. 2, 3 आणि 4 ऑक्टोबर असे सलग तीन दिवस महाराष्ट्रात निचांकी रूग्णसंख्या आढळते आहे. एकीकडे तिसरी लाट येऊ शकते का अशी चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातील रूग्णसंख्या कमी होते आहे.

ADVERTISEMENT

आपण पाहुया तीन दिवसांची रूग्णसंख्या

शनिवार 2 ऑक्टोबर – 2696 पॉझिटिव्ह रूग्ण

हे वाचलं का?

रविवार 3 ऑक्टोबर- 2692 पॉझिटिव्ह रूग्ण

सोमवार 4 ऑक्टोबर- 2026 पॉझिटिव्ह रूग्ण

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

20 सप्टेंबरला सात महिन्यांमधली निचांकी संख्या

20 सप्टेंबरला म्हणजेच मागच्या सोमवारी सर्वात कमी रूग्णसंख्या महाराष्ट्रात नोंदवली गेली होती. 2583 रूग्ण गेल्या सोमवारी दिवसभरात पॉझिटिव्ह होते

27 आणि 28 सप्टेंबर या सलग दोन दिवशी रूग्णसंख्येत घट

त्यानंतर 27 सप्टेंबरला 2432 पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली होती.तर 28 सप्टेंबरला 2844 पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली होती. सलग दोन दिवस रूग्णसंख्या 3 हजारांच्या आत होती.

सलग तीन दिवस महाराष्ट्रातली रूग्णसंख्या कमी होते आहे आणि नक्कीच चांगली बाब आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 5389 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 86 हजार 59 रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.31 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 93 लाख 37 हजार 713 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 62 हजार 514 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 40 हजार 88 होम क्वारंटाईन आहेत तर 1355 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 33 हजार 637 सक्रिय रूग्ण आहेत.

आज राज्यात 2026 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 62 हजार 514 इतकी झाली आहे.

आज राज्यातील कोविड बाधित रुग्णांचे 26 सप्टेंबर पर्यंतचे रिकाँसिलिएशन पूर्ण करण्यात आले आहे. मागील बाधित रुग्ण नंतर अद्ययावत होणे, दुहेरी नोंद झालेले रुग्ण वगळणे, रहिवाशी पत्त्यानुसार अंतर्गत बदल इत्यादी बाबीमुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्येत 1139 ने वाढ झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यांच्या बाधित आणि क्रियाशील रुग्णसंख्येत काही बदल झाला आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड 19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो असं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT