“रशियन गर्लला बोलवून सतीश कौशिकला ब्लू पिल्स देऊ” : महिलेच्या तक्रारीने खळबळ
Satish Kaushik Death Case : अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Actor Satish Kaushik) यांच्या मृत्यूप्रकरणात घातपाताचा संशय बळावला आहे. त्यांच्या मृत्यूबाबत एका महिलेने तिचा उद्योगपती पती आणि कुबेर ग्रुपचे प्रमुख विकास मालू याच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे. दिल्ली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तिने विकास मालूने सतीश कौशिक यांच्याकडून गुंतवणुकीसाठी १५ कोटी रुपये घेतल्याचा दावा केला […]
ADVERTISEMENT

Satish Kaushik Death Case :
अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Actor Satish Kaushik) यांच्या मृत्यूप्रकरणात घातपाताचा संशय बळावला आहे. त्यांच्या मृत्यूबाबत एका महिलेने तिचा उद्योगपती पती आणि कुबेर ग्रुपचे प्रमुख विकास मालू याच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे. दिल्ली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तिने विकास मालूने सतीश कौशिक यांच्याकडून गुंतवणुकीसाठी १५ कोटी रुपये घेतल्याचा दावा केला आहे. कोरोना काळात पैसे बुडाल्यानंतर सतीश कौशिक यांना मार्गातून हटविण्यासाठी कट रचला, असा आरोप करण्यात आला आहे. (In the case of Satish Kaushik’s death, the second wife of businessman Vikas Malu is raising suspicion of conspiracy)
नेमकं काय आहे प्रकरण?
व्यापारी विकास मालूच्या दुसऱ्या पत्नीने दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना पाठवलेल्या तक्रारीत म्हंटलं की, “माझा 13 मार्च 2019 ला विकास मालू यांच्याशी कायदेशीर विवाह झाला होता. विकासनेच माझी ओळख अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्याशी करून दिली. भारतात आणि दुबईत ते आमच्या कुटुंबाचे अत्यंत जवळचे पाहुणे होते. त्यांचं आमच्या घरी नियमित येणं-जाणं होतं.
23 ऑगस्ट 2022 रोजी सतीश कौशिक आमच्या दुबईमधील घरी आले होते. यावेळी त्यांनी विकासकडे त्यांचे 15 कोटी रुपये परत मागितले. त्यावेळी मी ड्रॉईंग रूममध्ये होते. सतीश कौशिक आणि विकास यांच्यात पैशांवरुन वाद झाला. आपल्याला या पैशांची गरज असल्याचं सतीश कौशिक सांगत होते. सतीशजींनी 3 वर्षांपूर्वी विकासला गुंतवणुकीसाठी 15 कोटी रुपये दिले होते. परंतु विकासने ना त्या पैशाची गुंतवणूक केली ना तो पैसे परत केले. तो सतीश यांच्या सोबत एकप्रकारे फसवणूक करत होता.