Nitin Gadkari: “… म्हणून देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं कौतुक केलं आहे. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या आर्थिक सुधारणांच्या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. भारतातील गरीबांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने उदार आर्थिक धोरणाची गरज आहे असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

टॅक्स इंडिया ऑनलाइन पोर्टल अवॉर्ड या कार्यक्रमात मंगळवारी नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलं आहे. लिबरल अर्थव्यवस्थेमुळे देशाला नवी दिशा मिळाली. त्यामुळे देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे असं म्हणत नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं कौतुक केलं आहे.

काय म्हटलं आहे नितीन गडकरी यांनी?

मनमोहन सिंग हे १९९१ मध्ये देशाचे अर्थमंत्री होते. त्यावेळी त्यांनी आर्थिक सुधारणा करून भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली होती. यामुळे देशात उदारमतवादी अर्थव्यवस्थेची सुरूवात झाली. लिबरल अर्थव्यवस्थेमुळे देशाला नवी दिशा मिळाली. त्यामुळे देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे असं म्हणत नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं कौतुक केलं आहे.

हे वाचलं का?

१९९० मध्ये मी महाराष्ट्रात मंत्री असताना निधी उभारता आला

१९९० मध्ये मी महाराष्ट्रात मंत्री असताना मनमोहन सिंग यांनी केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे १९९० च्या दशकात रस्ता बांधण्यासाठी निधी उभारता आला होता अशी आठवण नितीन गडकरींनी सांगितली. तसंच उदार आर्थिक धोरण हे शेतकरी आणि गरीब लोकांसाठी आहे. उदारमतवादी आर्थिक धोरण कोणत्याही देशाच्या विकासात कशी मदत करू शकतं याचं चीन हे उत्तम उदाहरण आहे. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी भारताला अधिक भांडवली खर्च गुंतवणुकीची गरज आहे असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

एनएचएआय महामार्गाच्या बांधकामासाठी सर्वसामान्यांकडून निधी गोळा करत असल्याचंही नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात सांगितलं. एवढंच नाही तर ते म्हणाले की आमचं खातं २६ ग्रीन एक्स्प्रेस वे बांधत आहे. त्यांना निधीची कमतरता भासत नाही. NHAI चा टोल महसूल सध्या ४० हजार कोटी रूपयांवरून २०२४ च्या अखेरीस १.४० लाख कोटींपर्यंत वाढणार आहे. देशातल्या गरीब लोकांना त्यांच्या जीवनात आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने भारता आर्थिक धोरण आखण्याची गरज असल्याचंही मत नितीन गडकरींनी व्यक्त केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT