उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस ठरवून एकत्र आले? ठाकरेंना टोला लगावत राऊतांनी दिलं उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस ठरवून एकत्र आले? ठाकरेंना टोला लगावत राऊतांनी दिलं उत्तर
उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस ठरवून एकत्र आले? ठाकरेंना टोला लगावत राऊतांनी दिलं उत्तर
social share
google news

Sanjay Raut Reaction on uddhav Thackeray and Devendra fadnavis Meet: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधानभवन परिसरात भेट झाली. दोन्ही नेते प्रवेशद्वारापासून बोलत विधानभवनात गेले. अडीच तीन वर्षांपासून आलेल्या राजकीय दुराव्यानंतर प्रथमच दोन्ही नेते एकत्र आल्याने कटुता संपल्याची चिन्हे आहेत का अशी चर्चा सुरू झाली. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही भेट स्क्रिप्टेड होती, अशी टीका केली. त्यावर खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं.

ADVERTISEMENT

माध्यमांशी बोलताना सुरूवातीला राऊतांनी किरीट सोमय्या यांच्या पदवीबद्दल भाष्य केलं. राऊत म्हणाले, “मुंबई विद्यापीठ, न्यायालय, ईडी, सीबीआय यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, अशी आज परिस्थिती आहे. ही सगळी दुकानदारी त्यांचीच आहे. सगळ्या यंत्रणा एका राजकीय पक्षाच्या टाचेखाली काम करत आहेत. हे काल सूरतच्या न्यायालयावरून स्पष्ट झालं. राहुल गांधींसंदर्भात जो निकाल देण्यात आला.

राज ठाकरेंनी कान टोचण्याचा धंदा सुरू करावा; संजय राऊतांचा खोचक सल्ला

त्यांच्या नेत्यांचे भाषण स्क्रिप्टेड होतं, तसं म्हणताहेत का? संजय राऊत काय म्हणाले?

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे ठरवून एकत्र आले, असा सूर काही राजकीय पक्षातून उमटला. संदीप देशपांडेंनी म्हटलंय की, “हे स्क्रिप्टेड होत. त्यावर संजय राऊत म्हणाले, जसं त्यांच्या नेत्यांचं भाषण स्क्रिप्टेड होतं, तसं म्हणताहेत का? मी असं वाचतोय, ऐकतोय की, सगळं काही स्क्रिप्टेड होतं. शिवसेनेला काही स्क्रिप्टेड करण्याची गरज नाही. आम्हाला बाहेरून सलीम जावेद लागत नाही. आम्ही समर्थ आहोत. आम्ही स्वतंत्र बुद्धीने काम करतो, विचार करतो. आमचा पक्ष स्वतःच्या पायावर उभा आहे. आम्ही जे ठरवलं ते पुढे नेतो. दुसऱ्यांची डोकी आम्हाला लागत नाही”, अशी खोचक टीका संजय राऊतांनी मनसे संदीप देशपांडे यांच्यावर केली.

हे वाचलं का?

नरेंद्र मोदींचा अमृतकाळ हाच, राऊतांनी सुनावले खडेबोल

राहुल गांधी यांना सूरत येथील सत्र न्यायालयाने अवमानना प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यावर बोलताना संजय राऊतांनी मोदींवर टीका केली. “सत्ताधाऱ्यांचे जे राजकीय विरोधक आहेत, त्यांच्याच चुका शोधून काढल्या जात आहेत. नसलेल्या चुकांना मोठं स्वरूप देता. कारवाया करता, दबाव आणता, पक्ष फोडता, सरकारं पाडता, यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर होतोय. हे लपून राहिलेले नाही. नरेंद्र मोदी म्हणताहेत सध्या अमृतकाळ सुरू आहे. हाच त्यांचा अमृतकाळ सुरू आहे. बदल्याचे राजकारण”, असं संजय राऊत म्हणाले.

“उद्धवजी, पुन्हा एकदा शांतीने विचार करा”, फडणवीसांची भेट, सुधीर मुनगंटीवारांची ऑफर?

त्या भूमिकेतूनच सूरतचा निकाल दिला असावा; संजय राऊतांना शंका

राहुल गांधींवरील कारवाईबद्दल बोलताना आणि सरन्यायाधीशांबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “सरन्यायाधीश बघितील. त्यांना मर्यादा आहेत. तरीही एकांडा शिलेदार म्हणून ते लढताहेत. महाराष्ट्रातील रामशास्त्रींचं पाणी ते दाखवत आहेत. राहुल गांधी यांना ज्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा झालीये, ती नरेंद्र मोदी यांची बदनामी आहे, असं वाटत असेल, तर नरेंद्र मोदींनी खटला दाखल करायला हवा होता. चौथी पार्टी खटला दाखल करते आणि सूरतचे न्यायालय त्यावर निकाल देते. हा काय प्रकार आहे. कशाकरिता हे चाललंय सगळं? राहुल गांधींची लोकसभेतील खासदारकी रद्द करावी, यासाठी हा सगळा आटापिटा सुरू आहे. त्या भूमिकेतून सूरतचा निकाल दिला असावा, असं स्पष्ट आहे”, असं म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT