Weapons of Hamas: ‘हमास’कडे असं काय आहे ज्याने Israel केलं सळो की पळो?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

israel armor iron come could not stop weapons of hamas what weapons does hamas have that
israel armor iron come could not stop weapons of hamas what weapons does hamas have that
social share
google news

Israel Hamas War: तेल-अविव: इस्रायलकडे अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा आहे. म्हणजेच असे चिलखत आहे की, ज्यामुळे कोणीही मारा करू शकत नाही. पण दरवर्षी हमास ते भेदण्यासाठी प्रयत्न करतं. हमासकडे अशी कोणती शस्त्रे आहेत जी इस्रायलची सुरक्षा कवच भेदण्यात यशस्वी ठरतात? (israel armor iron come could not stop weapons of hamas what weapons does hamas have that)

इस्रायलची (Isreal) सर्वात शक्तिशाली हवाई संरक्षण यंत्रणा म्हणजे आयर्न डोम. शत्रूचे रॉकेट आणि हवेत येणारी क्षेपणास्त्रे नष्ट करणारे तंत्रज्ञान. पण जेव्हा हमासने 20 मिनिटांत 5 हजार रॉकेट डागले तेव्हा ही यंत्रणा त्यांना पूर्णपणे रोखू शकली नाही. काही रॉकेट इस्रायलमध्ये पडले. ज्यामध्ये 700 हून अधिक लोक मारले गेले.

आयर्न डोममध्ये एक प्रकारची क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ज्यामध्ये जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत. शत्रूची क्षेपणास्त्रे, रॉकेट, ड्रोन दिसताच ते तात्काळ फायर केले जातात. संपूर्ण इस्रायलमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्याची रेंज 70 किलोमीटर आहे. असे असूनही हमासच्या रॉकेट आणि आत्मघाती ड्रोनमुळे इस्रायलमध्ये एकच हाहाकार उडाला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हमासचे 114 किमीचे शॉर्ट रेंज रॉकेट्स. (फोटोः एक्स/न्यूजआयएडीएन)

 

शॉर्ट रेंज रॉकेट

– 15 किमी रेंजचे 1000 स्वयं-चालित रॉकेट प्रणाली.
– 20 किमी रेंजचे 2500 तस्करी रॉकेट.
– 20 किमीची रेंज असलेले 200 स्वयंनिर्मित ग्रॅड रॉकेट

ADVERTISEMENT

मध्यम श्रेणीचे रॉकेट

– 45 किमी रेंजचे 200 आधुनिक स्व-चालित ग्रॅड रॉकेट, त्याच श्रेणीतील 1000 रॉकेट हे तस्करीतून खरेदी करण्यात आले आहेत.
– 80 किमी रेंजसह 400 स्वयंनिर्मित रॉकेट. याचे अनेक प्रकार आहेत. त्यांची मारक क्षमताही वेगळी आहे.

ADVERTISEMENT

लांब पल्ल्याचे रॉकेट्स

– 100 ते 200 किमी लांब पल्ल्याच्या डझनभर रॉकेट.

 (फोटोः रॉयटर्स)

हमासच्या रॉकेटमुळे संपूर्ण इस्रायलला धोका…

हमासकडे असलेल्या रॉकेटचा प्रकार संपूर्ण इस्रायलसाठी धोकादायक आहे. उदाहरणार्थ, R160 रॉकेटची रेंज 160 किलोमीटर आहे. ते संपूर्ण देशात कुठेही हल्ला करू शकतात. याशिवाय हमासकडे M-75 सारखे 75 किमी पल्ल्याचे रॉकेट्स आहेत, जे 60 किलो वजनाची शस्त्रे वाहून नेऊ शकतात. याशिवाय, 45 किलो शस्त्रास्त्रे वाहून नेणारी 48 किलोमीटरची रेंज असलेले ग्रॅड रॉकेट देखील आहेत. सर्वात कमी अंतरासाठी म्हणजे 17.7 किलोमीटरसाठी QASSAM रॉकेट आहेत. ते त्यांच्यासोबत 9 किलो शस्त्रे घेऊन जाऊ शकतात.

हमासकडे जीपीएस गाइडन्स ड्रोन आणि क्षेपणास्त्रे

इस्रायलला पराभूत करण्यासाठी हमास आता सातत्याने शस्त्रे बनवत आहे. यात जीपीएस मार्गदर्शित ड्रोन आणि क्षेपणास्त्रे आहेत. तो संशोधनात पैसा गुंतवत आहे. रोबोटिक कार बनवणे, सायबर युद्ध, मानवरहित पाणबुड्या बनवत आहेत. हमासच्या नौदलाने समुद्रात किनाऱ्यालगत बोगदे बांधले आहेत. ज्याचा उपयोग आणि शस्त्रे लपण्यासाठी आणि आत-बाहेर करण्यासाठी केला जातो.

कुणाला संशय येऊ नये म्हणून हमास खेळण्यांसोबत हे ड्रोन ऑर्डर करतं. याद्वारे ते प्रथम रेकी करतात. मग हल्ले केले जातात. ड्रोनच्या मदतीने ते आपल्या नौदलाच्या कमांडोंना कपडे आणि शस्त्रे पाठवतात. हमासकडे 40 टनांहून अधिक अमोनियम क्लोराईडचा साठा आहे, ज्याचा वापर स्फोटके बनवण्यासाठी केला जातो.

रॉकेटपेक्षा ड्रोन आणि ग्लायडर उत्तम

ड्रोन आणि ग्लायडर हे रॉकेटपेक्षा चांगले आहेत. कारण आयर्न डोम त्यांना रोखू शकत नाही. जर त्यांची उंची कमी असेल तर ड्रोन किंवा ग्लायडरद्वारे अधिक अचूक हल्ले केले जाऊ शकतात. यावेळी हमासनेही तीच पद्धत अवलंबली. प्रथम रॉकेट फायर केले. त्यानंतर मोटार ग्लायडरद्वारे दहशतवाद्यांना शहरांमध्ये सोडण्यात आले. यानंतर ड्रोन आणि भूदलाने घुसखोरी केली. जेणेकरून जास्तीत जास्त नुकसान करण्यात आलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT