उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील, तो निवडून येईल; ‘मातोश्री’वरील भेटीनंतर जयंत पाटलांचं विधान

मुंबई तक

शिवसेनेत बंडखोरी झाली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार कोसळलं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आलं आहे. दीड दोन महिन्यांच्या काळात झालेल्या या उलथापालथीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबई Takशी बोलताना भाष्य केलं. “शिवसेनेची मोडतोड होईल, असं तुम्ही म्हणालात. आमदार गुवाहाटीत गेल्यानंतर ते परत येतील, असं शिवसेनेतून आणि तुम्हीही म्हणाला होता. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

शिवसेनेत बंडखोरी झाली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार कोसळलं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आलं आहे. दीड दोन महिन्यांच्या काळात झालेल्या या उलथापालथीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबई Takशी बोलताना भाष्य केलं.

“शिवसेनेची मोडतोड होईल, असं तुम्ही म्हणालात. आमदार गुवाहाटीत गेल्यानंतर ते परत येतील, असं शिवसेनेतून आणि तुम्हीही म्हणाला होता. पण कुणीही परत शिवसेनेत परतलं नाही. याबद्दलचं तुमचं आकलन चुकलं का?”, या प्रश्नावर जयंत पाटील यांनी भूमिका मांडली.

“उद्धव ठाकरेंनी जास्त विश्वास टाकला. ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असावेत असं मला वाटतं. त्यांना असं वाटत होतं की, रोज बोलणारी लोक कसे सोडून जातील, या कल्पनेत ते असावेत. नक्की काय झालं याबद्दल त्यांनाच विचारलं पाहिजे. आमदारांना पकडून ठेवणं, हे त्यांनी अजिबात केलं नाही. त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर असणारी माणसंही निघून गेली. त्यांचा पक्ष आणि त्यामुळे कसा चालवायचा हा निर्णय त्यांचा आहे”, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.

उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील, तो निवडून येईल -जयंत पाटील

“काल भेटल्यानंतरही आम्हाला एक विश्वास त्यांच्यात दिसला की, जो उमेदवार ते देतील. तो उमेदवार निवडून येईल. शिवसेनेनंही अनेकदा करून दाखवलं आहे. ४० जण गेलेत, त्यातील ४-५ जण सोडले, तरी बाकीचे निवडून येणं अवघड आहे. फुटलेल्या आमदारांनीही हा विचार केलेला असणार आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

हे वाचलं का?