Jayant Patil: ‘वंचित’बद्दल NCP सकारात्मक! मातोश्रीवर काय झाली चर्चा?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Jayant Patil On Shiv Sena (UBT)-vanchit Bahujan Aghadi alliance : वंचित बहुजन आघाडीसोबत (vanchit Bahujan Aghadi) शिवसेनेनं (UBT) आघाडी केली. त्यामुळे महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) मित्रपक्ष काय भूमिका मांडणार याकडे लक्ष होतं. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) चालणार का? असाही प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसकडून सकारात्मक भूमिका मांडण्यात आलीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP State President) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर याबद्दल भूमिका मांडली. (Jayant Patil Reaction On Shiv Sena (UBT) alliance with vanchit Bahujan Aghadi)

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांची मातोश्रीवर बैठक झाली. मंगळवारी रात्री या बैठकीत काही मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

Maharashtra Politics : मातोश्रीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (UBT) नेत्यांची काय चर्चा झाली?

महाविकास आघाडीतील शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, संजय राऊत, अनिल देसाई, जयंत पाटील उपस्थित होते. तब्बल अडीच तास चाललेल्या बैठकीत विधान परिषद निवडणूक आणि चिंचवड, कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीबद्दल चर्चा करण्यात आली. विधान परिषदेच्या 5 जागांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली.

हे वाचलं का?

प्रकाश आंबेडकर पहिल्यांदा खासदार कसे झाले होते?

वंचित बहुजन आघाडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक

प्रकाश आंबेडकर यांचा आधीचा भारिप आणि आताची वंचित बहुजन आघाडी पक्ष सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात राजकीय भूमिका घेत आलेला आहे. त्या मागची कारणंही प्रकाश आंबेडकरांनी वेळोवेळी सांगितली आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेसोबत (UBT) आघाडी केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असेल? असा प्रश्न गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर एकत्र नांदू शकतील का? इतिहास काय सांगतो?

ADVERTISEMENT

याबद्दल आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सकारात्मक भूमिका मांडली आहे. महत्त्वाचं म्हणजे या नव्या आघाडीचं जयंत पाटलांनी स्वागत केलं आहे. जयंत पाटील म्हणाले, “आमच्यामधील पक्षांनी इतर घटक पक्ष जोडले तर त्यांचं स्वागत करण्याचीच आमची भूमिका आहे. सर्वांनी मिळून जास्तीत जास्त मत एकसंघ करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. शिवसेना-वंचितच्या चर्चेचा तपशील अद्याप आमच्याकडे आलेला नाही, आज त्यावर चर्चा झाली नाही. शिवसेनेने नवे सहकारी जोडले तरी इतर पक्ष यांना सहकार्य करतील”, असं जयंत पाटील म्हणालेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT