Ganesh Utsav: कल्याणच्या ‘मी शिवसेना बोलतेय’ देखावा साकारणाऱ्या विजय तरूण मित्रमंडळाची कोर्टात धाव
कल्याणमध्ये विजय तरूण मित्र मंडळाने शिवसेना बोलतोय असं म्हणत एका वटवृक्षाचा देखावा साकारला होता. गणेश उत्सवाच्या औचित्याने साकारण्यात आलेल्या या देखाव्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर विजय तरूण मित्र मंडळाने या कारवाईविरोधात कल्याणच्या कोर्टात याचिका दाखल केली आहे. मंडळाचे सदस्य आणि विश्वस्त विजय साळवी कोर्टात उपस्थित झाले होते. मात्र सरकारी पक्षाचं कुणी आलं नाही त्यामुळे ही […]
ADVERTISEMENT

कल्याणमध्ये विजय तरूण मित्र मंडळाने शिवसेना बोलतोय असं म्हणत एका वटवृक्षाचा देखावा साकारला होता. गणेश उत्सवाच्या औचित्याने साकारण्यात आलेल्या या देखाव्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर विजय तरूण मित्र मंडळाने या कारवाईविरोधात कल्याणच्या कोर्टात याचिका दाखल केली आहे. मंडळाचे सदस्य आणि विश्वस्त विजय साळवी कोर्टात उपस्थित झाले होते. मात्र सरकारी पक्षाचं कुणी आलं नाही त्यामुळे ही सुनावणी उद्यावर गेली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायमूर्तींनी या प्रकरणात डीसीपी. वरिष्ठ पीआय आणि इतरांना सरकारच्या पक्षातर्फे उपस्थि राहण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे कल्याणच्या देखाव्याचं प्रकरण?
कल्याण मधील विजय तरुण मंडळाने यंदा शिवसेनेतील राजकीय घडामोडींवर चलचित्र देखावा साकारला होता. पक्ष निष्ठा या विषयावर चलचित्र देखावा साकारला होता. मी शिवसेना बोलतेय इथून या चलचित्र देखाव्याची सुरूवात करण्यात आली आहे. या देखाव्यात शिवसेनेला मोठा वृक्ष दाखवण्यात आला आहे. या वृक्षाला फळे लागल्यानंतर ती इतर पक्ष खातात अशा आशयाचा हा देखावा होता. मात्र याला कल्याण पोलिसांनी आक्षेप घेतला असून मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करत या देखाव्यावर काल पहाटेच्या सुमारास कारवाई करत देखाव्याची सामग्री जप्त केली. ज्यानंतर या मंडळाने कोर्टात धाव घेतली.
पोलिसांनी जप्त केलेला विजय तरुण मंडळाचा देखावा कसा होता?