Kangana Ranaut: “बॉलिवूड स्टार किड्स हे उकडलेल्या अंड्यांसारखे दिसतात”

मुंबई तक

बॉलिवूडमधल्या घराणेशाहीच्या विरोधात अभिनेत्री कंगना रणौत कायमच आक्रमक झालेली पाहण्यास मिळते. आता पुन्हा एकदा तिचं एक वक्तव्य चर्चेत आहे. बॉलिवूडमधल्या स्टार किड्सवर म्हणजेच हिरो-हिरोईन्सच्या मुलांवर तिने टीका केली आहे. बॉलिवूड स्टार किड्समुळे बाहेरून आलेल्या कलाकारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो असं तिने म्हटलं आहे. एवढंच नाही तर या स्टार किड्सची तुलना तिने उकडलेल्या अंड्यांशी केली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बॉलिवूडमधल्या घराणेशाहीच्या विरोधात अभिनेत्री कंगना रणौत कायमच आक्रमक झालेली पाहण्यास मिळते. आता पुन्हा एकदा तिचं एक वक्तव्य चर्चेत आहे. बॉलिवूडमधल्या स्टार किड्सवर म्हणजेच हिरो-हिरोईन्सच्या मुलांवर तिने टीका केली आहे. बॉलिवूड स्टार किड्समुळे बाहेरून आलेल्या कलाकारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो असं तिने म्हटलं आहे. एवढंच नाही तर या स्टार किड्सची तुलना तिने उकडलेल्या अंड्यांशी केली आहे.

थलायवीचे कौतुक न केल्याबद्दल कंगना राणौतने बॉलिवूडवर चढवला हल्ला, म्हणाली…

काय म्हणाली कंगना?

“साऊथमधल्या म्हणजेच दाक्षिणात्य अभिनेत्यांसोबत प्रेक्षक लवकर कनेक्ट होतात. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे ते कलाकार त्यांच्या चाहत्यांसोबत कनेक्शन निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. बॉलिवूडमधे तसं नाही. बॉलिवूडमधले स्टार किड्स शिक्षण घ्यायला विदेशात जातात. तिथे इंग्रजीत बोलतात. हॉलिवूडचे चित्रपट पाहतात. असे किड्स जर सिनेमात आले तर प्रेक्षक त्यांच्याशी कनेक्ट कसे होतील? त्यांचा लुक वेगळा असतो. एखाद्या उकडेल्या अंड्यासारखे ते दिसतात. त्यामुळे प्रेक्षक त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकत नाहीत. मला त्यांना ट्रोल करायचं नाही.” असंही कंगनाने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp