Kannada Actress Chethana Raj: सर्जरीनंतर अभिनेत्रीचा मृत्यू, 21व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
बंगळुरू: कन्नड चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. कन्नड टीव्ही अभिनेत्री चेतना राज हिचे वयाच्या अवघ्या 21 वर्षीय निधन झाले आहे. चेतना राज हिने बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार चेतनाने आदल्या दिवशी वजन कमी करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली होती. पण शस्त्रक्रियेतील चुकीमुळे दुसऱ्या दिवशी तिला फुफ्फुसाचा त्रास जाणवू […]
ADVERTISEMENT
बंगळुरू: कन्नड चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. कन्नड टीव्ही अभिनेत्री चेतना राज हिचे वयाच्या अवघ्या 21 वर्षीय निधन झाले आहे. चेतना राज हिने बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार चेतनाने आदल्या दिवशी वजन कमी करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली होती. पण शस्त्रक्रियेतील चुकीमुळे दुसऱ्या दिवशी तिला फुफ्फुसाचा त्रास जाणवू लागला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
चेतनाने आई-वडिलांपासून लपवून ठेवलेली शस्त्रक्रिया
रिपोर्ट्सनुसार, चेतनाने तिच्या आई-वडिलांना तिच्या शस्त्रक्रियेबद्दल काहीही सांगितले नव्हते आणि ती तिच्या मित्रांसह शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर अचानक तिचा मृत्यू झाला. या सगळ्या घटनेमुळे चेतनाच्या आई-वडिलांना जबर धक्का बसला आहे.
हे वाचलं का?
पालकांनी डॉक्टरांवर केला निष्काळजीपणाचा आरोप
शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्रीच्या शरीरात काही गुंतागुंत निर्माण झाली आणि अभिनेत्रीच्या फुफ्फुसात फ्लूइड जमा होऊ लागलं. ज्यानंतर चेतनाचा मृत्यू झाला. चेतना राज हिच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.
ADVERTISEMENT
चेतनाबद्दल बोलायचे झाले तर ती कन्नड टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री होती. अनेक टीव्ही शोमध्ये काम करून तिने आपली खास ओळख निर्माण केली होती. चेतना ही Geetha आणि Doresani या मालिकांमधील तिच्या उत्कृष्ट भूमिकांसाठी ओळखली जाते. चेतनाने अवघ्या वयाच्या 21 व्या वर्षी अशी अचानक एक्झिट घेतल्याने तिच्या कुटुंबीयांसह तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
अभिनेत्रीचा राहत्या घरातच लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी बंगाली अभिनेत्री पल्लवी डे हिने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. पल्लवी डे (Pallavi Dey) हिचा लटकलेला मृतदेह कोलकाता येथील राहत्या घरात सापडला होता.
पल्लवीचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पल्लवीला फासावर लटकलेले पाहून तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. पण हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच पल्लवीचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं.
अभिनेत्री ईश्वरी देशपांडे हिचा गोव्यात अपघाती मृत्यू
पल्लवीच्या अचानक आत्महत्येच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे. पल्लवी बंगाली टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. टीव्ही शो ‘मोन माने ना’मध्ये ती लीड रोलमध्ये दिसली होती. पल्लवीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर ‘रेशम झांपी’ या टीव्ही सीरियलमध्ये काम केल्यानंतर तिला विशेष ओळख मिळाली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT