”आत्महत्येचा विचार सतत मनात यायचा”, कपिल शर्माने सांगितला आयुष्यातला वाईट अनुभव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Kapil Sharma Feeling Suicidal : कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोमधून प्रेक्षकांना खळखळुन हसवणारा कपिल शर्मा (Kapil Sharma) सध्या झ्विगॅटो (Zwigato) या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातून तो गेल्या अनेक वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या त्याच्या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता असताना त्याने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. प्रेक्षकांना खळखळुन हसवणारा कपिल शर्मा हा डिप्रेशनचा शिकार होता? तसेच त्याच्या मनात नेहमी आत्महत्येचा विचार यायचा, असा खुलासा त्याने केला आहे. त्याच्या या खुलास्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (kapil sharma feeling suicidal on seedhi baat with sudhir chaudhary)

अॅंकर सुधीर चौधरी (Sudhir chaudhary) यांच्या सीधी बात या शोमध्ये कपिल शर्माने (Kapil Sharma) हजेरी लावली होती. या शोमध्ये कपिलने त्याच्या करीअर, आयुष्य आणि विविध विषयावर उत्तरे दिली. यासोबतच त्याच्या आयुष्यात आलेला वाईट अनुभव देखील त्याने सांगितला आहे. सध्या या मुलाखतीचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या मुलाखतीत दोघे बातचीत करताना दिसत आहे.

Satish Kaushik यांचा संशयास्पद मृत्यू?; पोलिसांना नेमकं काय सापडलं?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तुम्ही कधी आत्महत्या करण्याचा विचार केला आहे का? असा सवाल सुधीर चौधरी यांनी कपिल शर्मा यांना केला होता. यावेळी कपिलने (Kapil Sharma) आयु्ष्यातला तो वाईट अनुभव सांगितला. त्या काळात असं वाटायचं, आपलं कोणीच नाहीये, आणि कोणीच दिसतच नाही. ना समजवणारा कोण आहे? ना काळजी घेणारा कोण आहे ? हे ही लक्षात यायचं नाही की कोण जवळ आहे. जी माणसं आहेत ती त्यांच्या फायद्यासाठी जोडली गेली आहेत. खासकरून कलाकार मंडळी, असा कटू अनुभव त्याने यावेळी शेअर केला.

आलिया भट्टचे प्रायव्हेट फोटो लीक, रणबीर कपूर प्रचंड भडकला

ADVERTISEMENT

डिप्रेशनचा शिकार

छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कपिल शर्मा (Kapil Sharma) डिप्रेशनचाही शिकार होता. तुम्ही डिप्रेशनचे शिकार झालेलात की स्टारडम संभाळू शकला नव्हतात, असा प्रश्न देखील सुधीर चौधरी यांनी उपस्थित केला होता. याबाबत देखील त्याने या शोमध्ये मोठा खुलासा केला होता. यासह सुधीर चौधरी यांनी कपिलला अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. तुम्ही मुलांना आपल्या शोमध्ये मुली का बनवता? तसेच स्वत:च्या मिडल क्लास सवयीबाबत त्यांनी उत्तर दिली आहेत. ही मुलाखत आज शनिवारी रात्री 9 वाजता आज तकच्या चॅनेलवर पाहता येणार आहे. या मुलाखतीची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान कपिल शर्माचा आगामी झ्विगॅटो (Zwigato) हा सिनेमा डिलीव्हरी बॉयच्या आयुष्यावर आधारीत आहे. डिलिव्हरी बॉयच्या संघर्षाची कहानी या सिनेमात सांगण्यात आली आहे. हा सिनेमा 17 मार्च 2023 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

प्रेग्नेंट नीना गुप्ताला घातलेली लग्नाची मागणी, सतीश कौशिकांचा ‘तो’ किस्सा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT