karuna sharma : मला दबाव टाकून पैसे उकळायचेत; करुणा शर्मांची कथित ‘कॉल रेकॉर्डिंग’ व्हायरल
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व करुणा शर्मा प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत असलेल्या करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल आढळून आल्यानं खळबळ उडाली. या प्रकरणात आता करुणा शर्मा यांची एक कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून, ऑडिओ क्लिपमधील आवाज करुणा शर्मांचा असल्याचा दावा केला जात आहे. धनंजय […]
ADVERTISEMENT
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व करुणा शर्मा प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत असलेल्या करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल आढळून आल्यानं खळबळ उडाली. या प्रकरणात आता करुणा शर्मा यांची एक कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून, ऑडिओ क्लिपमधील आवाज करुणा शर्मांचा असल्याचा दावा केला जात आहे.
ADVERTISEMENT
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा रविवारी परळीमध्ये होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आलं. हे पिस्तुल बेकायदेशीररित्या बाळगल्याचं समोर आलं. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात करुणा शर्मा यांच्यावर तक्रार दाखल झालेली असतानाच आता नवीन माहिती समोर आली आहे. करुणा शर्मा यांची परळीतील पत्रकार परिषद घेण्यापूर्वीची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
हे वाचलं का?
व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये करूणा शर्मा एका व्यक्तीशी बोलत आहेत. तो व्यक्ती पत्रकार परिषद घेण्यावरून करुणा शर्मा यांना सावध करण्याचा प्रयत्न करत आहे. पत्रकार परिषद घेऊन काही आरोप केले, तर न्यायालयाचा अवमान होईल, असं समोरचा व्यक्ती करुणा शर्मांशी बोलत आहे.
धक्कादायक ! करुणा शर्मांच्या गाडीत सापडलं पिस्तुल, हत्यार कुठून आलं याबद्दल संभ्रम कायम
ADVERTISEMENT
वकील सुषमा सिंह यांच्या नोटीसचा उल्लेखही या संवाद करण्यात आलेला असून, पत्रकार परिषदेत सांभाळून बोला, असा सल्ला समोरचा व्यक्ती करुणा शर्मा यांना देत आहे.
ADVERTISEMENT
त्यावर करुणा शर्मा म्हणतात, ‘ये तो बहुत अच्छा हुआ। इसमे तो फायदा है अपना। मै मंदिर जाऊंगी, और रायता फैला दुंगी। अपने को क्या रायता फैलाना है। अपने को पैसे निकालने है प्रेशर बनाके पैसे।’, असं करुणा शर्मा त्या व्यक्तीला म्हणत असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये आहे.
शरद पवार जेव्हा म्हणतात की आरोप गंभीर आहेत तेव्हा नेमकं काय होतं?
पत्रकार परिषदेला परळीत पोहचल्या अन्…
करुणा शर्मा यांची वैजनाथ मंदिर परिसरात पत्रकार परिषद होती. त्यामुळे पोलिसांनी मंदिर परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. करुणा शर्मा पत्रकार परिषदेसाठी आल्या. त्यानंतर विशाखा घाडगे आणि गुड्डी तांबोळी या दोन महिलांशी त्यांची बाचाबाची झाली. यावेळी करुणा शर्मा दोघींना म्हणाल्या, ‘तुम्ही पैसे घेऊन येथे आल्या आहात’. त्यानंतर त्यांच्यात झटापट झाली.
या वादानंतर गुड्डी तांबोळी या महिलेला करुणा शर्मा यांनी चाकू मारला. यात ती महिला जखमी झाली. महिलेवर अंबेजोगाई येथे उपचार सुरु आहेत. विशाखा घाडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन करुणा शर्मा व अरुण मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुलही सापडलं. हे पिस्तुल नेमकं कुठून आलं याबद्दल अद्याप खुलासा झालेला नाहीये. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती करुणा शर्मा यांच्या गाडीत काहीतरी वस्तू ठेवत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालं. त्यातच आता करूणा शर्मा यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT