कवठेमहाकांळ नगरपंचायतीची सत्ता राष्ट्रवादीकडे, आबांच्या आठवणीत रोहित पाटील भावूक
स्वाती चिखलीकर, प्रतिनिधी, सांगली कर्जत पाठोपाठ कवठे महांकाळ नगरपंचायतीमध्येही राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. रोहित पाटील यांनाही विजय मिळाला आहे. आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे विजयानंतर आबांच्या आठवणीत भावूक झालेले दिसले. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनलला 10 तर शेतकरी विकास पॅनला 6 जागांवर विजय मिळाला आहे. एका जागी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. […]
ADVERTISEMENT

स्वाती चिखलीकर, प्रतिनिधी, सांगली
कर्जत पाठोपाठ कवठे महांकाळ नगरपंचायतीमध्येही राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. रोहित पाटील यांनाही विजय मिळाला आहे. आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे विजयानंतर आबांच्या आठवणीत भावूक झालेले दिसले. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनलला 10 तर शेतकरी विकास पॅनला 6 जागांवर विजय मिळाला आहे. एका जागी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
मतदानापूर्वी रोहित पाटील यांनी केलेल्या भाषणातील वक्तव्याची चर्चा सगळीकडेच सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेची सांगता रोहित पाटील यांच्या भाषणाने झाली होती. त्यावेळी रोहित यांनी त्याचे वडील आणि महाराष्ट्राचे लाडके आबा आर. आर. पाटील यांची आठवण काढली होती. ‘आमच्या मनातील पॅनल निवडलं आहे असं सर्वसामान्यांचं मत आहे. निवडणूक निकाल 19 तारखेला जाहीर होईल. त्यानंतर मला वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही’ असं रोहित पाटील म्हणाले होते. आज विजयाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असला तरीही वडिलांच्या आठवणीत ते भावूक झालेले दिसले.
आज काय म्हणाले रोहित पाटील?