किरण गोसावीच्या ‘त्या’ महिला साथीदाराच्या हातात बेड्या, तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी

मुंबई तक

आर्थिक फसवणूक प्रकरणी किरण गोसावी अटकेत असून त्याची महिला साथीदार कुसुम गायकवाडला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी आज तिला न्यायालयात हजर केलं होतं. त्यानंतर न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून किरण गोसावी आणि त्याच्या महिला साथीदाराने पुण्यातील कसबा पेठ भागात राहणार्‍या चिन्मय देशमुख या तरुणाची आर्थिक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आर्थिक फसवणूक प्रकरणी किरण गोसावी अटकेत असून त्याची महिला साथीदार कुसुम गायकवाडला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी आज तिला न्यायालयात हजर केलं होतं. त्यानंतर न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून किरण गोसावी आणि त्याच्या महिला साथीदाराने पुण्यातील कसबा पेठ भागात राहणार्‍या चिन्मय देशमुख या तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याची घटना 2018 मध्ये घडली होती. त्या प्रकरणी चिन्मय याने फरासखाना पोलिसाकडे तक्रार दिल्यानंतर त्याचा शोध सुरू होता.त्याच दरम्यान आर्यन खान ड्रग्स प्रकरणी पंच म्हणून किरण गोसावी राहिला आणि त्यावेळी आर्यन सोबतचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

किरण गोसावीचा तो फोटो चिन्मय देशमुख याने पाहताच,त्याने पोलिसांना तक्रारीची आठवण करुन दिली आणि किरण गोसावी तोच आरोपी असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा किरण गोसावीचा पोलीस शोध घेत असताना, त्याला कात्रज येथून अटक करण्यात आली. त्यानंतर किरण गोसावीला न्यायालयात हजर केल्यावर वेळोवेळी तपास कामानिमित्त पोलीस कोठडी मध्ये वाढ झाली.त्याच दरम्यान राज्यातील 9 ठिकाणी किरण गोसावी विरोधात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले.त्यातील सुरुवातीला फरासखाना प्रकरण सुरू होतेच, लष्कर आणि वानवडी प्रकरणी यापैकी कोणी तरी किरण गोसावी याचा ताबा घेणार हे निश्चित मानले जात असताना.लष्कर पोलिसानी त्याचा ताबा घेऊन लष्कर न्यायालयामध्ये हजर केल्यावर 8 दिवसांची पोलीस सुनावण्यात आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp