धनंजय मुंडे किरीट सोमय्यांच्या रडारवर! जगमित्र कारखाना जमीन खरेदी प्रकरणात केला गंभीर आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील जगमित्र साखर कारखान्याच्या जमीन खरेदी प्रकरणी झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. सोमय्या गुरुवारी बीड जिल्हा दौर्‍यावर होते. ‘शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी गल्ली ते दिल्ली जाईन. मी पोलीस महासंचालकांना भेटणार आहे,’ असं सोमय्या आरोप करताना म्हणाले.

ADVERTISEMENT

किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी अंबाजोगाईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले, ‘बर्दापूर पोलीस निष्पक्ष चौकशी करतील यात शंका आहे. दहा वर्षे झाले 83 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून भाग भांडवल म्हणून गोळा करण्यात आले. हे पैसे गेले कुठे? या पैशाचा वापर कुठे करण्यात आला? या सर्वांची उत्तरे मिळाली पाहिजेत. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी’, अशी मागणी सोमय्या यांनी केली.

हे वाचलं का?

‘कारखाण्यासाठीची जागा फसवणुकीने घेतली गेली. मृत व्यक्तीचा अंगठा मारून जमीन बळकावली,’ असा आरोपही त्यांनी यावेळी केला. ‘धनंजय मुंडेंच्या माणसांनी मला गोळ्या घालण्याची धमकी दिली होती. मला धमकीचे दोन मेसेज आले. मी बीडच्या पोलीस अधीक्षकांना याबद्दल कळवलं आहे’, अशी माहितीही सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT