Kirit Somaiya: सोमय्या-हसन मुश्रीफ आमनेसामने, आरोपांचा धुरळा; नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाराष्ट्र सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर तब्बल 127 कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला आहे. ज्यानंतर याच प्रकरणी कोल्हापुरात जाण्यासाठी निघालेल्या सोमय्या यांना साताऱ्यातच रोखण्यात आलं. त्यामुळे भाजपकडून (BJP) महाविकास आघाडीवर जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणात मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मात्र सोमय्यांनी गंभीर आरोप केले आहेत. जाणून घेऊयात नेमके आरोप काय आहेत.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह आणि कुटुंबाच्या नावाने असणाऱ्या कंपन्यांद्वारे मनी लाँडरिंग आणि कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्यांनी या प्रकरणी सप्टेंबर महिन्यात ईडीकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच या संबंधीचे पुरावे अर्थ खात्याच्या सचिवांकडे देखील देण्यात येणार आहेत.

हे वाचलं का?

सोमय्या यांचे नेमके आरोप काय?

  • मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाने कोलकाता स्थित शेल कंपन्यांशी व्यवहार करणाऱ्या डझनभर कंपन्यांचं जाळं तयार केलं आहे. असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

  • फेक कंपन्यांच्या माध्यमातून उत्त्पन दाखवून त्या नावे उघडलेल्या बँक खात्यातून आर्थिक व्यवहार झाले असल्याचं दाखवलं असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.

  • ADVERTISEMENT

  • हसन मुश्रीफ, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा नवीद मुश्रीफ यांचे आर्थिक व्यवहार आणि पारदर्शकता नसलेल्या उत्पन्नाबाबतची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आयकर प्राधिकरणाकडे सादर केली आहे.

  • हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाला 100 कोटी रुपये कुठून मिळाले? याची चौकशी केली जावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी आयकर, अंमलबजावणी संचालनालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे.

  • हसन मुश्रीफ यांचा मुलगा नवीद मुश्रीफ यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संशयास्पद कंपन्यांसोबत विविध आर्थिक व्यवहार दाखवले आहेत. नाविद मुश्रीफ हा मेसर्स सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामधील प्रमुख भागधारक (शेअर होल्डर) आहे. असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

  • सर सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लिमिटेड कोल्हापूरमध्ये आर्थिक घोटाळा आणि मनी लाँड्रिंग झालं असल्याचा आरोप देखील सोमय्यांनी केला आहे.

  • नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी M/s CRM Systems Pvt Ltd कडून 2 कोटी आणि मेसर्स मारुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीकडून 3.85 कोटी कर्ज घेतले आहे. पण या दोन्ही कोलकात्यातील शेल कंपनी आहेत. असंही सोमय्यांनी म्हटलं आहे.

  • या कंपन्यांचे संचालक सिकंदर देसाई, आलमगीर मुजावर आणि गोपाल पोवार हे आहेत. जे हसन मुश्रीफ यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी आहेत. असं आरोप सोमय्यांनी केले आहेत.

  • किरीट सोमय्यांचा दुसरा आरोप काय?

    ‘हसन मुश्रीफ आणि आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी कारखान्याचा संबंध काय? हा मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा आहे. मुश्रीफ आणि कुटुंबीयांनी आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केला आहे.’

    चंद्रकांत पाटील खरे मास्टरमांईड… सोमय्यांचा टूल म्हणून वापर; हसन मुश्रीफांचा पलटवार

    ‘यातही त्याच पद्धतीने घोटाळा करण्यात आला आहे. ज्या कंपन्या बंद झाल्या आहेत अशा कोलकात्यातील शेल कंपन्याद्वारे 100 कोटींचे व्यवहार करण्यात आले आहेत. या व्यवहाराचे कागदपत्रे मी ईडी आणि आयकर विभागाकडे देणारं आहे.’

    ‘2020 मध्ये कोणत्याही प्रकारे पारदर्शक व्यवहार न होता हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लि. कंपनीला देण्यात आला. ब्रिक्स इंडिया कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नाही. पण, ब्रिक्स इंडियाला कारखाना का देण्यात आला? याबद्दल शरद पवारांना जास्त माहिती आहे. मतीन हासीम मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई ब्रिक्स इंडियाचे बेनामी मालक आहेत.’ असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT