लतादीदींकडे आहे कार्सचं खास कलेक्शन, जाणून घ्या आपल्यामागे किती संपत्ती सोडून गेल्या दीदी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्राणज्योत आज मालवली. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनाने भारतीय संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांनी कोरोना आणि निमोनियाशी लढा दिला. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

ADVERTISEMENT

संगीत क्षेत्रातलं त्यांचं योगदान मोलाचं होतं. अशात संगीत क्षेत्राशिवाय क्रिकेट आणि कार कलेक्शन या दोन्हीची आवड लता मंगेशकर यांना होती. लता मंगेशकर यांनी 36 भाषांमध्ये 50 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. आपण जाणून घेऊ लता मंगेशकर यांच्याकडे कोणत्या कार्सचं कलेक्शन आहे आणि त्या आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेल्या आहेत?

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

हे वाचलं का?

25 रूपये होती पहिली कमाई

मीडिया रिपोर्ट्सनुसार लता मंगेशकर यांनी वयाच्या 13 व्या वर्षी पहिलं गाणं म्हटलं होतं. त्यावेळी त्यांना त्याचा मोबदला म्हणून 25 रूपये मिळाले होते. लता मंगेशकर यांचं राहणीमान अत्यंत साधं होतं. त्यांना विविध कार्सची आवड होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार लता मंगेशकर यांच्यामागे त्यांची संपत्ती 370 कोटी रूपये आहे. यातली बहुतांश कमाई लतादीदींना त्यांच्या रॉयल्टीतून होत होती. त्याशिवाय त्यांनी अनेक ठिकाणी गुंतवणूकही केली होती. लता मंगेशकर यांचं घर मुंबईतल्या पेडर रोड या उच्चभ्रू भागात आहे. प्रभूकुंज या ठिकाणी असलेल्या घरात त्या राहात होत्या.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

लता मंगेशकर यांना कार्सची आवड

लता मंगेशकर यांना उंची कार्सची आवड होती. त्यांच्या गॅरेजमध्ये उत्तम प्रकारच्या उंची कार होत्या. लता मंगेशकर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की मला कार खूप आवडतात. लतादीदींनी सर्वात आधी एक Chevrolet खरेदी केली होती. ही कार त्यांनी इंदूरहून घेतली होती. ही कार त्यांनी आईच्या नावे घेतली होती. याशिवाय लतादीदींकडे Buick कार होती. तसंच Chrysler कारही होती. लता मंगेशकर यांना दिग्दर्शक यश चोप्रा यांनी एक मर्सिडिझ कारही भेट दिली होती.

लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की यश चोप्रांनी मला मर्सिडिझ कार भेट दिली होती. वीर झारा या सिनेमाच्या दरम्यान त्यांनी कारची चावी मला दिली होती. ते मला बहिणीप्रमाणे मानतात. त्यांनी गिफ्ट म्हणून ही कार मला दिली. माझ्याकडे आजही ती कार आहे असंही लतादीदी म्हणाल्या होत्या.

लतादीदींच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर संगीतविश्वात आणि कलाविश्वात शोककळा पसरली आहे. तसंच सोशल मीडियावरही त्यांना आदरांजली वाहिली जाते आहे. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात आज ही बातमी समजल्यामुळे अश्रू दाटून आले आहेत. लता मंगेशकर यांचा जादुई स्वर हा कायमच रसिकांच्या मनात रूंजी घालत राहिल यात शंका नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT