Latur : ग्रामपंचायतीच्या मतदानावर १०० टक्के बहिष्कार; गावकऱ्यांनी का घेतली संतप्त भूमिका?

मुंबई तक

लातूर (अनिकेत जाधव) : राज्यात आज (रविवारी) ७ हजार ५०० ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. त्याचवेळी लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी (बुद्रुक) गावात मात्र निवडणूक असूनही शांतता आहे. गावातील मतदानाची वेळ संपली पण आतापर्यंत एकही मतदान झालेलं नाही. गावकऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणूक मतदानावर १०० टक्के बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

लातूर (अनिकेत जाधव) :

राज्यात आज (रविवारी) ७ हजार ५०० ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. त्याचवेळी लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी (बुद्रुक) गावात मात्र निवडणूक असूनही शांतता आहे. गावातील मतदानाची वेळ संपली पण आतापर्यंत एकही मतदान झालेलं नाही. गावकऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणूक मतदानावर १०० टक्के बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे.

नेमकं काय आहे कारण?

बोंबळी (बुद्रुक) या गावची ग्रुप ग्रामपंचायत असून ती बोंबळी (खुर्द) या गावाला जोडलेली आहे. मात्र बोंबळी (बुद्रुक) गावाने मागील काही वर्षांपासून स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी केली आहे. याच मागणीसाठी आजच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.

स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी एका महिन्यापूर्वी देवणीचे तहसीलदार सुरेश घोळवे आणि लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांना निवेदन देण्यात आले होते, यात गावकऱ्यांकडून बोंबळी (बुद्रुक) स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी करण्यात आली होती. तसंच मागणी पूर्ण न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांकडून दिला गेला होता.